Beed Child Marriage News Saamtv
महाराष्ट्र

Beed Child Marriage: बालविवाह लावल्याप्रकरणी नवरदेवासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल; बीड जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

प्रशासनाच्या पुढाकाराने नवरदेव व इतर 8 नातेवाइकांविरोधात माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विनोद जिरे

Beed Latest News: परभणी जिल्ह्यातील (Parbhani) अल्पवयीन मुलीला बीडच्या गंगामसला गावात आणून बालविवाह लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रशासनाच्या पुढाकाराने नवरदेव व इतर 8 नातेवाइकांविरोधात माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Beed News)

याबाबत अधिक माहिती अशी की, बीडच्या (Beed News) माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथे मोरेश्वर मंदिरात दुपारी दीड वाजता परभणी जिल्ह्यातील निमगाव येथील अल्पवयीन मुलगी आणि गंगामसला येथील गणेश खंडेराया पारडे यांचा विवाह झाला.

त्या अनुषंगाने परभणी येथील बालकल्याण समिती आणि पंचायत समिती निमगाव यांनी चाइल्ड हेल्पलाइनच्या टीम मेंबरला 1098 या क्रमांकावर माहिती देऊन सदरील माहिती ही माजलगाव पंचायतला कळविली. (Child Marriage Beed)

सोहळ्यास उपस्थित नवरदेव गणेश पारडे, खंडेराया ज्ञानोबा पारडे, रुक्मिनी खंडेराया पारडे, कडाजी नारायण चौरे, शिवकन्या कडाजी चौरे, सिद्धेश्वर उर्फ बाळू हरिभाऊ काळे, निर्मला सिद्धेश्वर काळे व रामदेव जोशी यांच्यासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

मोठी बातमी! राज्यात तब्बल १.१४ लाख कोटींची गुंतवणूक; किती जणांच्या रोजगाराचा प्रश्न मिटणार?

SCROLL FOR NEXT