Beed Crime News Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime News: 'माझ्याशी लग्न कर' म्हणत शिवीगाळ करत मुलीची छेड; तरुणाविरोधात गुन्हा दाखल

Beed Ashti: 'माझ्याशी लग्न कर' म्हणत शिवीगाळ करत छेडछाड; तरुणाविरोधात गुन्हा दाखल

विनोद जिरे

बीड : एका तरुणांकडून मुलीला सातत्याने त्रास दिला जात होता. दरम्यान माझ्यासोबत लग्न कर, नाहीतर पळून चल, अशा धमक्या देत तरुणाने अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड केल्याची संतापजनक घटना (Beed) बीडच्या आष्टी तालुक्यात घडली. या प्रकरणी संबंधित आरोपी तरुणावर (Ashti) आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Breaking Marathi News)

रस्त्यात गाठून मुलींची छेड काढण्याचे प्रकार अजूनही थांबलेले नाही. असाच प्रकार बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एका गावात घडला. एकतर्फी प्रेमातून अनेक दिवसांपासून तरुण मुलीचा पाठलाग करत होता. याच दरम्यान मुलगी एकटी असल्याची संधी साधून आष्टी तालुक्यातील एका गावात 23 वर्षीय आरोपी तरुणाने पाठलाग करत लग्न कर नाहीतर माझ्यासोबत पळून चाल असे म्हणत मुलीला धमकी दिली. 

घडला प्रकार सांगितलं आई-वडिलांना 

दुपारच्या दरम्यान अल्पवयीन पीडित मुलीचा पाठलाग करत धमक्या देत शिवीगाळ केली होती. हा प्रकार मुलीने आई वडिलांना सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी आष्टी पोलिसात तक्रार दिली असून याप्रकरणी आरोपी तरुणावर बाललैंगिक अत्याचार कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway Missing Link: मुंबई- पुणे कनेक्टिव्हिटी बिघडली; एक्सप्रेसवेवर कोंडी नियोजनचं 'मिसिंग'

LPG Cylinder: महागाईच्या झळा, सामान्यांना 'कळा'! व्यावसायिक सिलेंडर 993 रुपयांनी महागला; खाद्यपदार्थांच्या किंमती वाढणार?

Pune Crime: गुरांच्या गोठ्यात ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, लैंगिक अत्याचारानंतर चिमुरडीची हत्या

Mumbai Pune Missing Link : 'मिसिंग लिंक'ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

Ladki Bahin Yojana: राज्यातील १ कोटी ८९ लाख लाडक्या बहिणी पात्र; ५४ लाख बहिणींना नाही मिळणार १५०० रुपये

SCROLL FOR NEXT