Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : कार पार्क करताच साधली संधी; काच फोडून लांबविली पावणेदोन लाखाची रोकड

Beed News : धक्कादायक.. कार पार्क करताच साधली संधी; काच फोडून लांबविली पावणेदोन लाखाची रोकड

Rajesh Sonwane

बीड : कामानिमित्ताने व्यापारी पाटोदा शहरात आले असता त्यांनी आपली कार मार्केटच्या पार्किंगमध्ये (Beed) पार्क केली. त्यांनी कारमध्ये रोकड ठेवली होती. परंतु (Patoda) त्यांच्यावर नजर ठेवून असलेल्या अज्ञात व्यक्तींनी कारची काच फोडून पावणेदोन लाख रुपयांची बॅग घेऊन पसार झाले. (Tajya Batmya)

कारची काच फोडून व्यापाऱ्याची १ लाख ८० हजार रुपयांची रोकड ठेवलेली बॅग चोरट्यांनी पळविल्याची घटना बीडच्या पाटोदा शहरात रात्रीच्या दरम्यान घडलीय. महादेव रोहिदास येवले (रा. बामदाळ वस्ती पाटोदा) असं व्यापाऱ्याचे नाव आहे. व्यापारी महादेव येवले यांचे पाटोदा येथे अडत व्यवसाय आहे. ते काही कामानिमित्त पाटोदा शहरातील कांकरिया यांच्या कृषी दुकानासमोर कारने आले होते. 

कार पार्क करताच साधली संधी 

कार पार्क करून महादेव येवले हे दुकानात गेले. ही संधी साधून चोरट्यांनी आडोसा व अंधाराचा फायदा घेत कारची काच फोडून १ लाख ८० हजार रुपयांची बॅग चोरुन नेली. याप्रकरणी महादेव येवले यांच्या फिर्यादीवरुन पाटोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

Crime : बलात्कारपीडित १३ वर्षीय मुलीला न्याय हवा होता, ज्याच्याकडे मदत मागितली त्या वकिलानेही केले अत्याचार

Jana Nayagan: विजय थलापतींच्या 'जन नायकन'च्या रिलीजची तारीख ठरली; नवीन पोस्टर प्रदर्शित करत केली मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT