Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : आई व पत्नीची साथ मिळत नाही..असे ठेवले व्हाटसअप स्टेटस; बेपत्ता झालेल्या शिक्षकाचा आढळला मृतदेह

Beed News : शिक्षक राजेंद्र गंडाळे हे बीडच्या पाटोदा शहरात कार्यरत होते. या दरम्यान गंडाळे हे आई व पत्नीची साथ मिळत नाही असे व्हाट्सअप स्टेटस ठेवून बेपत्ता झाले होते

विनोद जिरे

बीड : आई व पत्नीची साथ मिळत नाही असे वॉट्सअप स्टेटस ठेऊन बेपत्ता झालेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा बीडच्या सौताडा परिसरातील धबधब्याजवळ मृतदेह आढळून आला आहे. राजेंद्र गंडाळे असं मयत शिक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


शिक्षक (Teacher) राजेंद्र गंडाळे हे बीडच्या पाटोदा शहरात कार्यरत होते. या दरम्यान गंडाळे हे आई व पत्नीची साथ मिळत नाही असे व्हाट्सअप स्टेटस ठेवून बेपत्ता झाले होते. गंडाळे बेपत्ता झाल्याची तक्रारीची नोंद पाटोदा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. यानंतर नातलग, मित्रपरिवारासह पोलिसांकडून देखील (Beed News) शोध सुरु करण्यात आला  होता. मात्र शिक्षक गंडाळे हे सापडून आले नव्हते. 

दरम्यान शिक्षक राजेंद्र गंडाळे यांचा शोध सुरु असताना त्यांचा मृतदेह पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील धबधब्याजवळ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून याप्रकरणी आता पाटोदा पोलीसांकडून गंडाळे यांच्या मृत्यूचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT