Beed Political News Saamtv
महाराष्ट्र

Beed News: धक्कादायक! राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्याची गाडी पेटवण्याचा प्रयत्न; बीडमध्ये खळबळ

Beed Political News: राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आष्टी-पाटोदा-शिरूर विधानसभा मतदार संघातील स्थानिक पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांची गाडी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला.

विनोद जिरे

Beed Breaking News:

बीडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आष्टी-पाटोदा-शिरूर विधानसभा मतदार संघातील स्थानिक पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांची गाडी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री कन्हेवडगाव येथे घडली असून गाडी पेटवतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कमेऱ्यात कैद झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीडच्या आष्टी तालुक्यातील कन्हेवडगाव येथे राम खाडे यांनी राहत्या घरासमोर, स्कॉर्पिओ गाडी (क्र. एमएच 23, एएस 3044) उभी केली होती. मध्यरात्री 1 वाजता 4 अज्ञात तरुण तोंडाला रुमाल बांधून घराजवळ आले. त्यांनी गाडीवर पेट्रोल टाकून गाडी पेटवून दिली. त्यानंतर काचावर दगड मारले.

आवाज होताच टवाळखोर पळून गेले. दुसरीकडे खाडे यांचे बंधू बाहेर आले. त्यांनी कुटुंबियांना उठवले आणि गाडीवर पाणी टाकून आग नियंत्रणात आणली. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान राम खाडे यांनी भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas), त्यांची पत्नी प्राजक्ता धस यांच्यावर संशय व्यक्त केला असून तशी नोंद देखील पोलीस ठाण्यातील एफआयआरमध्ये आहे. याप्रकरणी पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update: एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील रवाना

SCROLL FOR NEXT