Beed News, Beed Latest Marathi News, Beed crime news Saam tv
महाराष्ट्र

Beed: खळबळ! बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

खळबळ! बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

विनोद जिरे

बीड : प्रशासकिय कामकाजाचा आठवड्यातील पहिला दिवस असून जिल्‍हाधिकारी कार्यालयात कामकाजाला सुरवात होत असताना कार्यालयाच्‍या आवारात खळबळजनक प्रकार घडला. हा प्रकार बीडच्या (Beed) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घडला असून एका तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्मदहनाचा प्रयत्न केला. (beed news Attempt of self immolation of a youth in the premises of Collector's Office)

बीड जिल्हाधिकारी (Beed Collector) कार्यालय परिसरात असणाऱ्या पोलीस चौकीच्या समोर या तरुणांने विषारी औषध प्राशन केले आहे. प्राथमिक माहितीनुसार समाधान शिवाजी धिवार असे त्या तरुणाचे नाव असून तो केज तालुक्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. तर समाधान याने नेमके विषारी औषध प्राशन का केले? हे मात्र समजू शकले नाही.(Beed Latest Marathi News)

जिल्‍हाधिकारी स्‍वतः पोहचले घटनास्‍थळी

दरम्यान घटनेची माहिती कळताच जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा यांनी स्वतः घटनास्थळी येत संबंधित तरुणाला एका रिक्षामध्ये बसवून त्याच्यासोबत पोलिसांना पाठविले. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या विष प्राशन केलेल्या समाधानवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

Maharashtra Politics: पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या मारल्या, आणि ही लोक भाषा विचारून हिंदूंना चोपतायत- आशिष शेलार|VIDEO

Nitin Gadkari :...म्हणून जागतिक स्तरावर युद्ध पेटू शकते; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता

Classmates Bollywood Celebrities: एका शाळेत शिकलेत 'हे' बॉलिवूडचे फेमस सेलिब्रिटी

SCROLL FOR NEXT