Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: ५ महिन्‍यांपासून बंद असलेला जनावरांचा आठवडे बाजार पुन्हा होणार सुरू; पशुपालकांना असेल ही अट

५ महिन्‍यांपासून बंद असलेला जनावरांचा आठवडे बाजार पुन्हा होणार सुरू; पशुपालकांना असेल ही अट

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात लम्पीच्या प्रादुर्भावामूळे जिल्ह्यातील जनावरांचे सर्व आठवडी बाजार मागील काही ५ महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण (Beed News) भागाचे आर्थिक उलाढाल ठप्प झाल्याची बातमी साम टिव्हीने दाखवली होती. याची दखल घेत जनावरांचा बाजार सुरू करण्याचे आदेश बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी काढले आहेत. यामुळे जिल्ह्यातील जनावरांचे आठवडी बाजार सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. (Live marathi News)

पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील गोवंशीय जनावरांचे (Lumpy Disease) लम्पी प्रतिबंधक लसीकरण शंभर टक्के झाल्याचा अहवाल आणि जिल्ह्यातील साथ आटोक्यात आली. यामुळे बीडच्या जिल्हाधिकारी तसेच आपत्ती व्यवस्थापन समिती अध्‍यक्ष दिपा मुधोळ-मुंडे यांनी जनावरांचे आठवडी बाजार सुरू करण्याचे आदेश काढले आहेत.

शेतकऱ्यांना हे बंधनकारक

आता आठवडी बाजार सुरू होणार ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. मात्र यासाठी जनावरांचे लम्पी प्रतिबंधक लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र शेतकऱ्यांना सोबत ठेवणं बंधनकारक आहे. बाजारात येताना प्रत्‍येक शेतकरीला हे प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम'

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

धक्कादायक! बिल भरण्यावरून वाद; बार मॅनेजरला चौघांनी बेदम मारहाण|VIDEO

SCROLL FOR NEXT