Beed News 9-year-old boy died after falling from gallery while removing stuck kite Saam TV
महाराष्ट्र

Beed News: भयंकर! पतंग काढताना गॅलरीतून तोल गेला; ९ वर्षीय चिमुकला जीवाला मुकला, बीडमधील घटनेनं हळहळ

विनोद जिरे

Beed Latest Marathi News

मकरसंक्रातीचा सण आठवडाभरावर असला तरी, अनेकांनी आतापासून पतंग उडवण्यास सुरुवात केली आहे. सुट्टीच्या वेळी चिमुकले पतंग उडवण्याचा आनंद घेत आहेत. अशातच बीडमध्ये एक भयानक घटना समोर आली आहे. गॅलरीत अडकलेला पतंग काढण्यासाठी गेलेल्या एका ९ वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील (Beed News) शहरातील पांगरी रोड परिसरात राहणाऱ्या कृष्णा दिलीप तकीक यांचा मुलगा रविवारी आपल्या गच्चीवरून पतंग उडवत होता.

दरम्यान, सांयकाळच्या वेळेस त्याचा पतंग गच्चीवरील तारांमध्ये अडकला. अडकलेला पतंग काढण्यासाठी चिमुकला गॅलरीत गेला असता, तोल जाऊन तो खाली पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. कुटुंबीयांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. (Latest Marathi News)

मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, मृत चिमुकल्यावर रविवारी रात्री उमरद जहॉगिर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने उमरद जहॉगिर व खापर पांगरी येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT