Beed Mamdapur Patoda Farmer News Saam TV
महाराष्ट्र

Beed News : नापिकी, कर्जाचे ओझे अन् आईचं आजारपण; अवघ्या ३२ वर्षीय शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं

Beed News: ही दुर्देवी घटना बीड जिल्ह्यातील ममदापूर पाटोदा गावात घडली. सुधीर छत्रगुण जाधव असं आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.

विनोद जिरे

Beed Farmer News: सततची नापिकी, आईचे आजारपण, वडिलांवर असणारे बँकेचे कर्ज यामुळे नैराश्यात गेलेल्या एका ३२ वर्षीय तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही दुर्देवी घटना बीड जिल्ह्यातील ममदापूर पाटोदा गावात घडली. सुधीर छत्रगुण जाधव असं आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. (Breaking Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, ममदापूर (Beed News) गावातील सुधीर जाधव यांना ५ एकर शेती आहे. त्याच शेतीच्या उत्पन्नावर कुटुंबाची मदार आहे. यातच वयोवृद्ध आईचे आजारपण आणि वडिलांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून घेतलेले दीड लाखाचे कर्ज, यामुळे सुधीर यांच्यावरील कर्जाचा बोजा वाढला होता.

त्यातचअतिवृष्टी आणि ऐन रब्बी हंगामात हातात आलेला घास काढत असताना, झालेली गारपीट यामुळे जाधव यांच्या शेतपिकांचे प्रचंड नुकसान झालं. या नैराश्येतून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. मंगळवारी (१८ एप्रिल) त्यांनी विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. (Latest Marathi News)

दरम्यान याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. सुधीर यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी एक लहान चिमुकली असा परिवार आहे. घरातील कर्ता-धर्ता व्यक्ती अचानक निघून गेल्याने जाधव कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

RBI Recruitment: इंजिनियर झालात? रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Solapur Temple Tourism: अक्कलकोट ते पंढरपूर, सोलापूरमधील या TOP 8 स्थळांना उन्हाळ्यात नक्कीच भेट द्या, मन होईल प्रसन्न

Ayan Ahmed Case: १८० मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या अयानचा नवा VIDEO समोर, तरुणाचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले

Summer Hair Care Tips: उन्हाळ्यात दररोज केस धुवावे की नाही? घाम आणि कोंडा होऊ नये म्हणून काय करावे?

SCROLL FOR NEXT