Aapasaheb Jadhav On Sushma Andhare  Saam Tv
महाराष्ट्र

Beed Mahaprabodhan Yatra: पक्षातून हक्कालपट्टी होऊनही आप्पासाहेब जाधव ठाम, पुन्हा सुषमा अंधारेंवर केला गंभीर आरोप

Latest News: पक्षातून हकालपट्टी करुन सुद्धा सुषमा अंधारे यांना मारहाण केल्यावर आप्पासाहेब जाधव हे ठाम आहे.

Priya More

Beed News: उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाची बीडमध्ये महाप्रबोधन यात्रा (Beed Mahaprabhodhan Yatra) होणार आहे. या यात्रेपूर्वीच ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप आणि पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव (Appasaheb Jadhav) आणि संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पण पक्षातून हकालपट्टी करुन सुद्धा सुषमा अंधारे यांना मारहाण केल्यावर आप्पासाहेब जाधव हे ठाम आहे. त्यांनी पुन्हा सुषमा अंधारेंवर (Sushma Andhare) गंभीर आरोप केला आहे.

उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातून हाकालपट्टी झाली असली तरी आपण सुषमा अंधारे यांना दोन चापटी लगावल्या असल्यावर आप्पासाहेब जाधव ठाम आहेत. सुषमा अंधारे यांनी मात्र आपल्याला मारहाण झाली नसल्याचे सांगितले आहे. तरी देखील आपला राग अनावर झाला आणि आपण सुषमा अंधारे यांना मारहाण केली, असल्याचे वक्तव्य आप्पासाहेब जाधव यांनी पुन्हा केले आहे. तसंच, वारंवार कार्यकर्त्यांना सुषमा अंधारे यांच्याकडून पैशाची मागणी देखील होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तसंच त्यांनी पुढे सांगितले की, 'तोंडाने सांगून ऐकत नसेल तर थोबाड बडवा हिच बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे. आमचे पद त्या विकत आहेत ते आम्हाला सहन झालं नाही. वारंवार सुषमा अंधारे कार्यकर्त्यांकडे पैशाची मागणी करत आहेत.' दरम्यान, उद्या बीडमध्ये महाप्रबोधन यात्रा होत आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी शिवसेनेच्या (Shivsena) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह संपर्कप्रमुख धोंडू पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव, उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यासह पदाधिकारी हे बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरातील सभा स्थळाची पाहणी करण्यासाठी गेले होते.

यावेळी आप्पासाहेब जाधव यांनी व्हिडिओ जारी करत सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सुषमा अंधारे पैसे घेऊन पद वाटप करत आहेत. यासह अनेक गंभीर आरोप या व्हिडिओच्या माध्यमातून आप्पासाहेब जाधव यांनी केले होते. यामुळेच मी त्यांना दोन चापटा लावल्या असा दावा त्यांनी व्हिडिओमध्ये केला होता. या दाव्यानंतर आप्पासाहेब जाधव यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT