संतापजनक! दारूसाठी पैसे न दिल्याने, पुतण्यानेच 60 वर्षीय चुलतीची दगडाने ठेचून केली हत्या... Saam Tv
महाराष्ट्र

संतापजनक! दारूसाठी पैसे न दिल्याने, पुतण्यानेच 60 वर्षीय चुलतीची दगडाने ठेचून केली हत्या...

बीडच्या हंगेवाडी येथील संतापजनक घटना हत्या करून पुतण्या फरार, पोलिसांकडून शोध सुरू

विनोद जिरे

तबरेज शेख

बीड: दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने, पारधी समाजातील पुतन्यानेच, 60 वर्षीय चुलतीची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या (killing) करत, गळ्यात दोरी बांधून मृतदेह जवळपास 100 फुटांपर्यंत फरफटत नेला आहे. ही संतापजनक अन् माणुसकीला काळिमा फासणारी घटना, 21 जानेवारीच्या मध्यरात्री बीडच्या (Beed) केज (kej) तालुक्यातील हंगेवाडी (Hangewadi) येथे घडली आहे. सखूबाई बन्सी शिंदे (वय- 60 ) रा. हंगेवाडी, ता. केज असे मयत महिलेचे नाव आहे. (Beed killing for not paying for alcohol)

हे देखील पहा-

बीडच्या नांदूरघाट (Nandurghat) परिसरातील हंगेवाडी शिवारात असणाऱ्या गायरान शेतात काही पारधी समाजातील कुटुंबे वास्तव्यास आहेत. या कुटुंबातील सखूबाई शिंदे यांचा मुलगा व सून उसतोडणीसाठी कारखान्याला गेलेले असतांना, त्यांचा दगडाने छिन्नविछिन्न केलेला मृतदेह काल आढळून आला आहे. यावेळी त्यांच्या गळ्यात एक दोरी आढळली. विशेष म्हणजे या दोरीच्या सहाय्याने घटनास्थळापासून जवळपास 100 फुटांपर्यंत त्यांना फरफटत नेल्याच्या खुणा आढळले आहेत.

तर मयत महिलेचा (woman) मुलगा कारखाण्यावरून आल्यानंतर, काल रात्री बराच वेळ गोंधळ उडाला होता. आरोपीला (accused)अटक (Arrested) करण्याची मागणी नातेवाईकातून केली जात होती. दरम्यान पोलिसांनी (police) अवघ्या काही तासात हत्या करणाऱ्यांचे नाव निष्पन्न केले असून याप्रकरणी मयत महिलेचा पुतण्या राजू शिंदे याच्यावर, केज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान फरार आरोपी राजू शिंदेचा पोलीस शोध घेत असून, केवळ दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने हत्या केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. केज पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांनी दिली असून या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

Maharashtra News Live Update: परभणीत मध्यरात्री धक्कादायक घटना; आलिशान कारमधून येत मोकाट गायीची चोरी

Hair Care: पावसाळ्यात फ्रिझी केसांपासून मिळवा सुटका; फॉलो करा या ५ सोप्या हेअर केअर टिप्स

हातात बेड्या अन् प्रचंड राग...पंतप्रधानांच्या घराबाहेर राहुल गांधींनी केलेल्या आंदोलनाची दृश्ये, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT