Beed News विनोद जिरे
महाराष्ट्र

कोरोना नियमांना हरताळ; इंदुरीकर महाराजांच्या जाहीर किर्तनाला हजारोंची गर्दी

धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमातून कोरोना संसर्गाला निमंत्रण...

विनोद जिरे

बीड - राज्यासह बीड (Beed) जिल्ह्यात कोरोनाची (Corona) दिवसेदिवस वाढती रुग्ण संख्या आणि ओमिक्रॉनचा धोका, यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळं धार्मिक, राजकीय कार्यक्रमाला बंदी घालण्यात आली आहे. मात्र ही बंदी फक्त नावा पुरतीच आहे का ? असा प्रश्न हा कार्यक्रम पाहून आपणास पडेल. बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील, कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केलेली असताना, बीडच्या नांदुरघाट गावात निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj) यांच्या किर्तनाला हजारो लोक एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी सोशल डिस्टंसिंग आणि कोरोना नियमांचा अक्षरशः फज्जा उडाल्याचं चित्र दिसून आलं. यावेळी संयोजक मंडळी आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

हे देखील पहा -

शासनाने कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या अनुषंगाने, नियमावली जाहीर करत निर्बंध लादले आणि शाळा महाविद्यालय बंद केले. मात्र दुसरीकडे अशा धार्मिक अन राजकीय कार्यक्रमाला हजारोची गर्दी कोरोनाला निमंत्रण देणारी आहे. सरकारच्या नाकावर टिच्चून निवृत्ती महाराज इंदुरीकर मोठमोठे कीर्तन घेत आहेत व किर्तनाला हजारोंचा जनसमुदाय विना मास्क एकत्र दिसत आहे.

तरी देखील शासन-प्रशासन मूग गिळून गप्प आहे का ? विशेष म्हणजे नांदुरघाट येथे पोलीस चौकीच्या समोर बाजार तळावर हजारो लोक एकत्र झाल्याचे दिसत असताना देखील, पोलिसांनी डोळेझाक केली. यामुळे संताप व्यक्त केला जात असून या जाहीर किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी केले होते. त्यामुळे राजकीय नेत्यांना कोरोना नियमात सूट दिलीय का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

Kitchen Hacks : पितळ आणि तांब्याच्या भांड्यांचा काळपटपणा जात नाहीये? 'या' ट्रिक्स वापरून होतील लख्ख

Fort : किल्ल्यात दडलाय सोन्याचा खजिना? रहस्य शोधण्यासाठी आजही पर्यटकांची गर्दी

SCROLL FOR NEXT