Beed : चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीसोबत शिक्षकाचे गैरकृत्य! Saam Tv
महाराष्ट्र

Beed : चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीसोबत शिक्षकाचे गैरकृत्य!

शाळा व्यवस्थापन शिक्षकाला पाठीशी घालत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

विनोद जिरे

बीड : बीड शहरातील नामांकित गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये (Gurukul English School) चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीसोबत, शिक्षकाने गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आल्यानंतर बीड (Beed) जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रत्यक्ष पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केलीय, मात्र अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या प्रकरणी शाळा व्यवस्थापन शिक्षकाला पाठीशी घालत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. (Beed Gurukul English School Teacher molestes school girl)

हे देखील पहा :

आम्ही कोणाच्या भरोशावर मुलींना शाळेत पाठवायचं? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे लाखों रुपयाची ट्यूशन फीस विद्यार्थ्यांकडून घेणारे संस्थाचालक, मुलांच्या सुरक्षेच्या उपाययोजना बाबतीत मात्र हलगर्जीपणा करत असल्याचे, या प्रकरणातून दिसून आले आहे. ज्या चौथीच्या वर्गामध्ये या मुलीवर गैरकृत्य झालं, त्या वर्ग खोलीत सिसीटीव्ही नव्हता. त्यामुळे नराधम शिक्षकावर व हलगर्जीपणा करणाऱ्या संस्थेवर कडक कारवाई करावी. अशी मागणी केली जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2026: भारतात दिसणार पहिलं चंद्रग्रहण कधी? धार्मिक नियम आणि सूतक काळ जाणून घ्या

Maharashtra Live News Update : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम पालघरमध्ये शेतकऱ्यांनी रोखलं

खूशखबर! भारतात ई-पासपोर्ट लाँच; फी किती भरावी लागेल आणि अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना लवकरच २१०० रुपये हफ्ता मिळणार, मंत्र्याचं मोठं विधान

Children diabetes risk: गोड, जंक फूडमुळे लहान मुलांमध्ये वाढतोय मधुमेहाचा धोका; चुकीच्या आहाराच्या सवयी पालकांनी कशा बदलाव्या?

SCROLL FOR NEXT