Satish Bhosale house bag was found  Saam Tv News
महाराष्ट्र

Satish Bhaosale : खोक्या भाईच्या घरात सापडलेल्या 'त्या' पिशवीत काय? गूढ आणखी वाढलं, प्रकरणाला मोठं वळण

Satish Bhosale News : सतीश भोसलेचं घर पाडण्यापूर्वी त्यातील सामान एका ट्रॅक्टरमध्ये ठेवण्यात आलं. मात्र खोक्याच्या घरातील सामान बाहेर काढत असताना त्याच्या घरामध्ये वनविभागाला एका पिशवी देखील आढळून आली आहे.

Prashant Patil

बीड : खोक्या उर्फ सतीश भोसले याला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्याच्यावर विविध प्रकरणात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. आता वनविभागाकडून देखील खोक्याला मोठा दणका देण्यात आला आहे. खोक्या राहत असलेलं घर हे वनविभागाच्या हद्दीत असल्याचं समोर आलं आहे, या प्रकरणात वनविभागाकडून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आज त्याच्या घरावर बुलडोझर देखील चालवण्यात आलं.

सतीश भोसलेचं घर पाडण्यापूर्वी त्यातील सामान एका ट्रॅक्टरमध्ये ठेवण्यात आलं. मात्र खोक्याच्या घरातील सामान बाहेर काढत असताना त्याच्या घरामध्ये वनविभागाला एका पिशवी देखील आढळून आली आहे. वनविभागानं त्याच्या घरातील इतर सामान ट्रॅक्टरमध्ये ठेवलं, मात्र ती पिशवी वेगळी ठेवण्यात आली आहे. या पिशवीमुळे आता या प्रकरणातील गूढ आणखी वाढलं आहे. या पिशवीमध्ये नेमकं काय आहे? हे अद्याप समोर येऊ शकलेलं नाहीये. मात्र या पिशवीत काही तरी महत्त्वाची गोष्ट असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अक्कलकोट स्वामी समर्थांचे मंदिर राहणार 20 तास खुले

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दिवाळीनंतर पीएम किसान योजनेचा हप्ता येणार; समोर आली अपडेट

Indrayani : इंद्रायणीची घोषणा! दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर होणार शाळेची पायाभरणी, कोण असणार खास व्यक्ती?

Shocking : धक्कादायक प्रकार! अंगणवाडीच्या खाऊमध्ये आढळला मेलेला उंदीर

गर्लफ्रेंडचे अश्लील व्हिडिओ, धमक्या अन् बलात्कार; कल्याणच्या राजकीय पक्षातील तरूणानं प्रेयसीला छळलं

SCROLL FOR NEXT