Beed Farmer  विनोद जिरे
महाराष्ट्र

बैलाने मारल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, केज तालुक्यातील घटना !

शेतकऱ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

विनोद जिरे

बीड : बैलाला वैरण टाकतांना बैलाने शिंग मारल्याने, जखमी झालेल्या शेतकऱ्याचा (Farmer) उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाआहे. ही घटना बीडच्या (Beed) उत्तरेश्वर पिंप्री गावात (village) घडली आहे. रामहरी उत्तमराव चंदनशिव (वय- ५०) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. रामहरी चंदनशिव हे शेतकरी शेतात बैलाला वैरणकाडी करत असताना, बैलाने (bull) शिंग मारून त्यांना जखमी केले आहे.

हे देखील पाहा-

यामुळे शेतकरी चंदनशिव यांच्या गळ्यावर शिंग लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना सुरुवातीला केजच्या उपजिल्हा रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले होते. परंतु, जखम गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई (Ambajogai) येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, अवघ्या काही तासातच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने चंदनशिव कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व हरपले; माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन

Maharashtra News Live Update: पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

आता अनेक महीने वाट बघण्याची गरज नाही; 1 ते 3 दिवसांत मिळणार पासपोर्ट; पण ‘ही’ अट महत्त्वाची

Satara Fort : महाबळेश्वरला गेलात? 'या' किल्ल्यावरून दिसतं सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य!

SCROLL FOR NEXT