आदेश निघाले! 'या' जिल्ह्यात लस घेतली तरच मिळणार तहसीलचे विविध प्रमाणपत्र Saam Tv
महाराष्ट्र

आदेश निघाले! 'या' जिल्ह्यात लस घेतली तरच मिळणार तहसीलचे विविध प्रमाणपत्र

तहसील कार्यालयाअंतर्गत दिली जाणारी विविध प्रमाणपत्रे, ही आता कोविड प्रतिबंधक लसीकरण (Corona Vaccine) केल्याचे प्रमाणपत्र सोबत जोडल्या शिवाय देऊ नयेत.

विनोद जिरे

बीड: तहसील कार्यालयाअंतर्गत दिली जाणारी विविध प्रमाणपत्रे, ही आता कोविड प्रतिबंधक लसीकरण (Corona Vaccine) केल्याचे प्रमाणपत्र सोबत जोडल्या शिवाय देऊ नयेत. तसेच त्याशिवाय कोणतेही अर्ज न स्विकारण्याचे सक्त निर्देश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी जिल्ह्यातील सर्व तहसील प्रशासनाला दिले आहेत. बीड जिल्ह्यात 52 टक्के नागरीकांनी कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. या लसीकरण मोहिमेला गती देऊन 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनानाने कठोर पावले उचलली आहेत.

याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालया अंतर्गत दिली जाणारी जात प्रमाण पत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाण पत्र, उत्पन्न प्रमाणपत्र आणि इतर विविध प्रमाणसाठी लसीकरण झाल्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत जोडणे अनिवार्य करावे, असा आदेश निर्गमित केला आहे. त्यामुळे आता लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र सोबत असेल तरच अर्ज स्विकारला जाईल आणि विविध प्रमाणपत्रे मिळतील अन्यथा मिळणार नाहीत. त्यामुळं आता रेंगाळलेल्या लसीकरणाला गती येण्याची शक्यता आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT