Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: घरात सुरु होती चिमुकल्याच्या वाढदिवसाची तयारी; इकडे पित्याचे धक्कादायक कृत्य

Dharur News घरात सुरु होती चिमुकल्याच्या वाढदिवसाची तयारी; इकडे पित्याचे धक्कादायक कृत्य

विनोद जिरे

बीड : घरात आपल्या चिमुकल्या मुलाच्या वाढदिवसाची तयारी सुरू होती. घरातील इतर मंडळी तयारी करत असतांना (Beed) पित्याने मात्र गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बीडच्या धारूर (Dharur) शहरात उघडकीस आली आहे. (Tajya Batmya)

धारूर शहरातील जाधव गल्लीतील राहुल माने (वय २७) असं आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव आहे. मयत राहुल माने याचे धारूर शहरात दुकान होते. त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. विशेष म्हणजे मयत राहुल याच्या ३ वर्षीय मुलाचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्याची पूर्ण तयारी झालेली असताना त्यानी हे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. 

आत्महत्येचे कारण अस्पष्ट 

सदर घटनेची माहिती मिळताच धारूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान मयत राहुल याने आत्महत्या का केली? हे अद्याप स्पष्ट झालं नसून याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात मृत्यूची आकस्मिक नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samosa Recipe : चटपटीत-खुसखुशीत समोसा बनवायचाय? परफेक्ट भाजीची रेसिपी पाहा

Raj Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे जाणार राज ठाकरेंच्या घरी, तारीख ठरली?

Maharashtra Live News Update : उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी जाणार

Rave Party : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात ७ आरोपींच्या घराची झडती, पोलिसांना ड्रग्ज सापडलं नाही, मोबाईल-लॅपटॉप जप्त

पती स्नॅक्स आणायला विसरला आणि पत्नीने केला चाकूहल्ला; पाहा धक्कादायक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT