Beed Crime Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime: 'तू माझ्याशी बोलली नाही तर...', रस्ता अडवत शाळकरी मुलीचा विनयभंग, कुटुंबीयांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

Beed Police: बीडमध्ये शाळकरी मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. रस्ता अडवत या मुलीचा तरुणाने विनयभंग केला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Priya More

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये बापलेकाने मुलींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडच्या केज तालुक्यातील एका गावात नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिचा विनयभंग करण्यात आला. 'तू माझ्याशी बोलली नाहीस तर मी आत्महत्या करीन. तुझ्या आई-वडिलांनाही मारीन.', अशी धमकी देत तिचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी निखिल कांबळे या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या तरुणाच्या वडिलांनी देखील एका शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नववीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन शाळकरी मुलीचा गेल्या १५ दिवसांपासून आरोपी तरुणाकडून विनयभंग केला जात होता. हा तरुण या मुलीचा दुचाकीवरून पाठलाग करत होता. शेवटी ४ जुलै रोजी त्याने या मुलीला रस्त्यात अडवत धमकावले. इतकंच नाही तर मुलीच्या घरचे त्याला जाब विचारण्यासाठी गेले असता एका महिलेला देखील त्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या आठ दिवसांतील केज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महिला अत्याचाराची ही तिसरी घटना आहे. वाल्मीक कराडचा समर्थक असलेल्या नानासाहेब चौरेने गतिमंद मुलीवर बलात्कार केला होता. तर बाळू कांबळेने गतिमंद तरुणीचा विनयभंग केला होता. यानंतर बाळू कांबळेचा मुलगा निखिल कांबळेने शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी निखिल कांबळेचा वडील बाळासाहेब कांबळे याच्याविरोधात देखील २ दिवसांपूर्वीच एका गतिमंद तरुणीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता.म

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matheran Accident: माथेरान घाटातून उतरताना ब्रेक फेल झाल्यानं कार उलटली; ६ पर्यटक अडकले अन्...

Pune Tourism : पाऊस अन् घनदाट जंगल, पुण्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट लोकेशन

Maharashtra Live News Update : साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट; नाशिक जिल्हा परिषदेतील विभागीय अधिकाऱ्यावर कारवाई होणार

Maharashtra Rain Update : राज्यात जोरदार पाऊस कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट? VIDEO

Neha Kakkar: नेहा कक्करचा व्हायरल लाबुबू डॉल लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT