Beed Crime Saam tv
महाराष्ट्र

महिला नायब तहसीलदारावर कार्यालयातच कोयत्याने हल्ला; सख्ख्‍या भावाचे कृत्‍य

धक्कादायक..महिला नायब तहसीलदारावर कार्यालयातच कोयत्याने हल्ला; सख्ख्‍या भावाचे कृत्‍य

विनोद जिरे

बीड : बीडच्या केजमध्ये महिला नायब तहसीलदारावर तहसील कार्यालयातचं कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. हा हल्ला संपत्तीच्या वादातून सख्या भावानेच केल्याची माहिती समोर (Beed) आली आहे. (beed crime news Woman Deputy Tehsildar attacked with scythe in office)

केज तहसील कार्यालयात सदर घटना आज दुपारी बारा वाजेच्या दरम्यान घडली. आशा वाघ असे जखमी नायब तहसीलदाराचे नाव आहे. त्या नेहमीप्रमाणे तहसील कार्यालयातील आस्थापना शाखेत बसलेल्या असताना त्यांचा सख्खा भाऊ आला. त्याने गोंधळ घालत अचानक धारदार कोयत्याने हल्ला (Crime News) चढवला. यावेळी कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला रूममध्ये कोंडून पोलिसांना पाचारण केले. दरम्यान, जखमी झालेल्या आशा वाघ यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे.

हल्‍लेखोर भाऊ ताब्‍यात

केज पोलिसांनी (Police) हल्लेखोर भाऊ असणाऱ्या मधुकर वाघ यास ताब्यात घेतले असून कोयता जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान हा प्रकार संपत्तीच्या वादातून घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT