Beed Crime News: दोन भावांमध्ये पाण्यावरुन हाणामारी; एका भावाचा महिन्यानंतर मृत्यू विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed Crime News: दोन भावांमध्ये पाण्यावरुन हाणामारी; एका भावाचा महिन्यानंतर मृत्यू

तर आरोपींना तात्काळ अटक करा ही मागणी घेऊन, मयताच्या मुलींसह नातेवाईक आक्रमक..

विनोद जिरे

विनोद जिरे

बीड: बीडच्या वडवणी तालुक्यातील कुप्पा येथे, विहिरीवरील पाण्यावरून भावांमध्ये वाद झाला होता. यामध्ये भावकितील लोकांनी दुसरा भाऊ संभाजी कारभारी वडचकर यांना जबर मारहाण केली होती. त्यांच्यावर बीड शहरातील लाईफ लाईन हॉस्पिटल येथे गेल्या एक महिन्यापासून उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा रात्री मृत्यू (Death) झालाय. (Beed Crime News)

या दरम्यान, ज्या वेळी मारहाण झाली होती, त्यानंतर संबंधित चार आरोपींवर, वडवणी पोलीस ठाण्यात 307 नुसार गुन्हा दाखल झाला होता. मात्र वडवणी पोलिसांनी या आरोपींपैकी एकालाही अटक केली नाही. असा आरोप मयत शेतकऱ्याच्या मुलासह मुलींनी केला आहे.

हे देखील पहा-

'उलट आम्हाला पुरावा मागत होते, आम्ही पुरावा कुठून आणायचा ? माझ्या वडिलांच्या नाकाचे दोन भाग झाले आहेत, कोयत्याने वार करण्यात आले आहेत. वडिलांनी हे सर्व पोलिसांना सांगितले आहे. मात्र अद्याप एकाही आरोपीला अटक केली नाही. त्यामुळे आता या सर्व आरोपींना अटक करावी, जोपर्यंत त्यांना अटक होत नाही. तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाहीत.' असा पवित्रा मयत संभाजी वडचकर यांच्या मुलासह मुलींनी घेतलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti : खोटं व्हायला शिका नाहीतर दुनिया देईल धोका, चाणक्यांनी सांगितली ५ गंभीर गुपितं

Face Care: रोजच्या प्रवासामुळे चेहरा पूर्ण डल झालाय? मग आठवड्यातून २ वेळा लावा ही घरी तयार केलेली पेस्ट

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरेंचा फुटलेल्या खासदारांच्या मतदार संघात दौरा

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

Hardik Pandya : टीम इंडियाला सर्वात मोठा झटका; इंग्लंड वनडे मालिकेतून भरवशाचा खेळाडू बाहेर

SCROLL FOR NEXT