Beed News Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime : नात्याला काळीमा! बहिणीचे अश्लील फोटो काढून अत्याचार; भावास अटक

पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करत बेड्या ठोकल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीड - 20 वर्षीय विवाहिता कपडे बदलतानाचे चोरून अश्लील फोटो काढत, ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, आत्याभावाने बहिणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संतापजनक घटना बीडच्या (Beed) वडवणी तालुक्यात उघडकीस आली आहे. आकाश काळे असे नराधम आरोपी तरुणाचे नाव आहे. (Beed Crime News)

वडवणी तालुक्यातील चिंचाळा गावात आपल्या मामाकडे शिक्षणासाठी आलेल्या नराधम आरोपी आकाश काळे याने मामाच्या सुनेवरचं वाईट डोळा ठेवला. त्याने पीडिता अंघोळ करून कपडे बदलत असतानाचे चोरून अश्लील फोटो काढले. त्यांनतर शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. (Tajya Batmya)

जर शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला, तर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, नराधम आत्याभाऊ असणाऱ्या आकाश काळे याने विवाहितेवर एक ना अनेक वेळा अत्याचार केला. या वारंवार होणाऱ्या ब्लॅकमेलिंगला कंटाळलेल्या पिडितेने, शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देताच, आरोपीने तिचे अश्लील फोटो तिच्या पतीसह नातेवाईकांना पाठवत व्हायरल केले. (Beed News Toady)

याप्रकरणी पिडितेने दिलेल्या फिर्यादीवरून, नराधम आरोपीवर वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करत बेड्या ठोकल्या आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Airtel Recharge : खुशखबर! Airtel च्या सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये दिवसाला 4GB, अनलिमिडेट कॉलिंग, २० OTT अॅप...; लगेचच घ्या जाणून

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट! डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती|VIDEO

Weekly Horoscope: खर्चावर नियंत्रण आवश्यक असून मतभेदही टाळावे लागतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Viral Video: प्रवास मेट्रोचा, राडा मात्र गावरान, मेट्रोतील हाय-व्होल्टेज ड्रामा; हाणामारीचा व्हिडीओ पाहा

Maharashtra Live News Update: अजित दादांचा घातपात झाला आहे - भास्कर जाधव

SCROLL FOR NEXT