Buldhana Crime News Saam TV
महाराष्ट्र

Beed Crime News: विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार करत जीवे मारण्याची धमकी; बीडमधील संतापजनक घटना

याप्रकरणी बीडच्या आष्टी पोलीस ठाण्यात पीडितेच्या फिर्यादीवरून मातावळी गावातील महेशवर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

विनोद जिरे

Beed Crime News: "तुझ्या नवऱ्याला सोडून दे मी तुझ्यासोबत लग्न करतो." असं म्हणत सासरी नांदणाऱ्या २० वर्षीय विवाहितेला सतत फोन करून नराधम तरुणाने तिचा संसार मोडला. त्यानंतर नवऱ्यानं माहेरी आणून सोडल्यावर, घरात कोणी नसल्याची संधी साधून पीडितेचे तोंड दाबून बळजबरीने तिच्यावर अत्याचार करण्यात आलाय. ही धक्कादायक घटना बीडच्या मातावळी गावात 7 जुलै रोजी उघडकीस आली. याप्रकरणी बीडच्या आष्टी पोलीस ठाण्यात पीडितेच्या फिर्यादीवरून मातावळी गावातील महेशवर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. (Latest Crime News)

याविषयी पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटल आहे, की माझी व माझ्या गावातीलच महेशची चांगली ओळख होती. आमच्या दोघात प्रेमही होतं. मात्र आमच्या प्रेमप्रकरणाची माहिती माझ्या कुटुंबीयांना कळाल्यानंतर मी महेशला माझ्यासोबत लग्न कर, असं म्हटलं. त्याने अगोदर होकार दिला मात्र त्यानंतर तो नाही म्हणाला.

त्यानंतर माझ्या आई-वडिलांनी पाटोदा तालुक्यातील मुलासोबत लग्न लावून दिलं. तिथं आमचा संसार चांगला सुरू होता. मात्र महेशने मला सतत फोन करणे सुरू केलं. "तू तुझ्या नवऱ्याला सोडून दे, मी तुझ्यासोबत लग्न करतो". असं म्हणत तो सतत फोन करू लागला.

या फोनची माहिती माझ्या नवऱ्याला कळल्यानंतर त्याने मला माहेरी आणून सोडलं. गेल्या 2 वर्षांपासून मी माझ्या वडिलांकडे माहेरी राहते. या 2 वर्षात महेशने मला लग्नाचे आमिष दाखवले. मी तुझ्यासोबत लग्न करतो म्हणून त्याने माझ्या वडिलांच्या घरात, बाजूला असलेल्या शेतात, नदीच्या परिसरात माझ्या सोबत शारीरिक संबंध ठेवले. मात्र लग्न कर म्हटल्यावर त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. नकार दिला. त्यामुळे मी त्याला बोलणं सोडलं.

मात्र पुन्हा गेल्या 2 दिवसांपूर्वी 7 जुलै रोजी आरोपीने पीडितेला फोन केला. यावेळी त्याने तिला भेटण्यास सांगितले. मात्र पीडितेने त्याला नकार दिला. यावर आरोपीने थेट महिलेच्या घरी धाव घेतली. दुपारी घरी कोणी नसल्याचे पाहून संधी साधत त्याने महिलेवर लैंगिक अत्याचार केला. तसेच सदर माहिती कोणाला सांगितल्यास जीवे मारुन टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी बीड (Beed) पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

SCROLL FOR NEXT