Beed Crime Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime : संतापजनक..चिमुकलीवर ३ नराधमांकडून अत्याचार; बीडच्या चौसाला येथील धक्कादायक घटना

Beed News : चिमुकलीला १०० रुपये व चिकन खायला देण्याचे आमीष दाखवले. त्यानंतर पीडित चिमुकलीच्या जुन्या घरात जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला

विनोद जिरे

बीड : राज्यात सातत्याने होत असलेल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेत पुन्हा एका घटनेची भर पडली आहे. एका १० वर्षीय चिमुकलीवर तीन जणांनी मिळून लैंगिक अत्याचार करण्यात आला. शंभर रुपये व चिकन खायला देण्याचे अमिष देत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बीडच्या चौसाळा गावात घडली आहे. 

बीडच्या (Beed) चौसाळा येथील १० वर्षीय पीडित चिमुकलीला राजेंद्र रामलिंग चंदनशिवे, सागर राजेंद्र चंदनशिवे (दोघेही रा. वंजारवाडी ह. मू. चौसाळा) तसेच आशिफ कुमार चौधरी उर्फ कल्लू (नेपाळी) ह.मू. वाशी, जि. धाराशिव या तिघांनी मिळून चिमुकलीला १०० रुपये व चिकन खायला देण्याचे आमीष दाखवले. त्यानंतर पीडित चिमुकलीच्या जुन्या घरात जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. जर अश्लील कृत्याची ही बाब कोणाला (Crime News) सांगितल्यास तुझ्या आई वडिलांना जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. 

दरम्यान याप्रकरणी पीडित बालिकेने घडला प्रकार घरात सांगितला. यानंतर तिच्या आईने पोलिसात धाव घेत घडला प्रकार सांगत तक्रार दाखल केली. दिलेल्या फिर्यादीवरून बीडच्या नेकनुर पोलीस ठाण्यात बालक लैंगिक अपराध संरक्षण कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांकडून अत्याचार करणाऱ्याचा शोध सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT