Beed Crime Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime : बीडमध्ये भर रस्त्यावर गोळीबार; एक जण गंभीर जखमी, पोलिसात गुन्हा दाखल

Beed News : बीडच्या मांजरसुंबा ते लिंबागणेश रोड दरम्यान असलेल्या मुळकवाडी येथे सदरची घटना सकाळच्या सुमारास घडली

विनोद जिरे

बीड : बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडच्या मुळकवाडी येथे भर रस्त्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संदीप तांदळे असं जखमी व्यक्तीचे नाव आहे.

बीडच्या (Beed) मांजरसुंबा ते लिंबागणेश रोड दरम्यान असलेल्या मुळकवाडी येथे सदरची घटना सकाळच्या सुमारास घडली. या घटनेत मूळकवाडी येथे संदीप तांदळे हा उभा होता. यावेळी त्या ठिकाणी आलेल्या बाळा बांगर यांच्यासह (Crime News) अन्य दोघांनी त्या ठिकाणी येत संदीप तांदळे यांच्या दिशेने चार राऊंड फायर केले. यामध्ये संदीप तांदळे हे जखमी झाले असून त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पोलिसात गुन्हा दाखल 

दरम्यान या प्रकरणात बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्यात तिघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी दिली. दरम्यान हा गोळीबार कोणत्या कारणामुळे करण्यात आला आहे. याचे कारण अद्याप समोर आले नसून पोलिसांकडून तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT