Beed Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News in Beed : तरुण मित्रांसोबत जेवणासाठी बाहेर गेला...; सकाळी मुलाला पाहून आईच्या पायाखालची जमीनच सरकली

मित्रांसोबत त्याचा वाद होऊन त्याची हत्या झाली करण्यात आल्याचा संशय यामध्ये व्यक्त केला जात आहे.

विनोद जिरे

Beed News : बीडमधून एक हळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका १८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झालाय. बीडच्या गेवराई तालुक्यातील पोईतांडा गावात ही घटना उघडकीस आली आहे. या तरुणाचा मृतदेह त्याच्याच घराबाहेरील परिसरात आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Beed News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रामेश्वर ज्ञानेश्‍वर राठोड (वय १८ )असं मयत तरुणाचं नाव आहे. या तरुणास काल सायंकाळच्यावेळी त्याच्या मित्रांनी जेवणासाठी धाब्यावर बोलवले होते. मात्र आज सकाळी या तरुणाचा मृतदेह तलवाडा परिसरातील मेघदूत हॉटेलच्या आजुबाजुस आढळून आला. मित्रांसोबत त्याचा वाद होऊन त्याची हत्या झाली करण्यात आल्याचा संशय यामध्ये व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, रामेश्वरचा मृतदेह पाहिल्यानंतर त्याच्या अंगावर काही खुणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे रामेश्वरची हत्या झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. तसेच आरोपीला तात्काळ अटक करावी, अशी मागणी देखील नातेवाईकांनी केली आहे. त्यावरून तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॉलेजमध्ये जाणारी मुलं घरातील मोठ्या सदस्यांचे न ऐकता मनमानी करण्याचा प्रयत्न करतात. रामेश्वरला देखील त्याच्या कुटुंबीयांनी बाहेर जाण्यापासून एकदा रोखलं होतं. मात्र त्यावेळी त्याने आई वडीलांचे काहीही न ऐकता मित्रांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तरुण मुलांच्या डोक्यात पटकन कोणत्याही कारणावरून राग भरतो. रामेश्वर आणि त्याच्या मित्रांचे देखील भांडण झाले. त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याच्यावर हल्ला केला असा आरोप रामेश्वरच्या कुटुंबींनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हिंगोलीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

Ashok Kharat: कल्पना खरात कुठे आहे? भोंदू खरातने पोलिसांना दिली महत्वाची अपडेट

Krishna Sugar Factory : मोठी बातमी! कृष्णा कारखान्याची निवडणूक लांबणीवर पडणार, कारण आले समोर

BCCI Rules 2026: IPL मध्ये हनीट्रॅपचा धोका? बीसीसीआय अ‍ॅक्शन मोडमध्ये, थेट नियमावली जाहीर

Actor Sold Property: सलमानचा भाऊ अरबाज खानने विकला आलिशान फ्लॅट; मिळाले कोट्यवधी रुपये

SCROLL FOR NEXT