Beed Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: बीड जिल्हा हादरला..घरातून फरफटत ऊसाच्या शेतात नेत सामूहिक अत्याचार; महिलेने काढले फोटो

बीड जिल्हा हादरला..घरातून फरफटत ऊसाच्या शेतात नेत सामूहिक अत्याचार; महिलेने काढले फोटो

विनोद जिरे

बीड : शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या मजुराच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Crime News) केल्याची संतापजनक घटना समोर आली. आई- वडील कामाला गेल्याची संधी साधत घरातून फरफटत ओढत शेजारील उसाच्या शेतामध्ये नेऊन तीन नराधम तरुणांनी आळीपाळीने बलात्कार केला. दोन दिवसांपूर्वीच पोटच्या मुलीवर नराधम बापाने बलात्कार केल्याची घटना ताजी असताना पुन्हा या सामूहिक बलात्काराच्या घटनेने (Beed News) बीड जिल्हा हादरला आहे. (Tajya Batmya)

पोलीस (Police) सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून मंठा तालुक्यातील एक कुटुंब दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलुरा (Beed) गावातील शेतकऱ्याच्या शेतावर कामाला आहे. शुक्रवारी सकाळी आई– वडील शेतात कामाला गेल्याने त्यांची १७ वर्षीय पीडित मुलगी घरी एकटीच होती. ही संधी साधत आरोपी बाळू उर्फ महादेव सुधाकर फपाळने पीडित मुलीला शेजारील उसाच्या फडात फरफटत ओढत नेले. यानंतर तिथे तिच्यावर विजय दशरथ फपाळ, अमोल प्रभाकर फपाळ, अक्षय अर्जुन फपाळ या तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला.

महिलेने काढले मुलीचे नग्‍न फोटो

या दरम्यान एका महिलेने सामुहिक अत्याचार होत असताना पीडित मुलीचे नग्न फोटो काढले. या घटनेमुळे दिंद्रुड परिसरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अल्पवयीन पीडित मुलीच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलिस ठाण्यात एका महिलेसह महादेव फपाळ, विजय फपाळ, अमोल फपाळ आणि अक्षय फपाळ यांच्यावर बाललैंगिक अत्याचार ॲट्रॉसिटीनुसार गुन्हे दाखल करण्यात आला आहे. नराधम आरोपी फरार होण्यापूर्वी सापळा रचत पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे यांच्यासह टीमने विजय फपाळ, अमोल फपाळ व अक्षय फपाळ या तीन नराधमांना तात्काळ जेरबंद केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT