Beed Crime News Saam TV News
महाराष्ट्र

स्प्रे मारून बेशुद्ध, शेतात नेत अत्याचार अन् बांधून टाकलं; बीडमध्ये अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य | Beed News

Beed Crime News: बीडमध्ये पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न! शेतात नेत विनयभंग अन् बांधून टाकलं. पोलीस निष्क्रियतेमुळे संतप्त ग्रामस्थांचा आक्रोश उफाळला!

Bhagyashree Kamble

बीडमधील वडाळी गावात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न.

पीडितेला गुंगी आणून तिचे हातपाय बांधून शेतात फेकले.

याआधीही दोन वेळा अशाच घटना घडल्या, मात्र पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई नाही.

संतप्त पालक आणि गावकऱ्यांनी पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप करत तपासाची मागणी केली.

योगेश काशिद, साम टिव्ही प्रतिनिधी

बीडमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचे हातपाय बांधून शेतात टाकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. गंभीर बाब म्हणजे गतवर्षी देखील दोन वेळा असाच प्रकार घडला होता. त्यावेळी पालकांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांकडून कारवाई झालेली नाही. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पीडित अल्पवयीन मुलगी बीडच्या शिरुर तालुक्यातील वडाळी गावातील रहिवासी असल्याची माहिती आहे. घटनेच्या दिवशी अल्पवयीन मुलगी घराच्या पाठीमागील बाजूस गेली होती. दरम्यान, २ अज्ञात आले त्यांनी तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. यानंतर तिला गुंगी आली. ती जागेवरच बेशुद्ध झाली.

यानंतर अज्ञात आरोपींनी तिला ओढत शेतात नेलं. तसेच तिचा विनयभंग केल्याची माहिती आहे. नंतर तिथेच तिला बांधून शेतात टाकून दिले. या प्रकरणाची माहिती पीडित मुलीच्या पालकांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मुलीची सुटका केली. संतप्त पालकांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

तसेच २ अज्ञात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, आरोपींविरोधात शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याआधीही अशीच घटना घडली होती. पालकांनी तक्रारही दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई झालेली नव्हती. मात्र, आता तिसऱ्यांदा ही घटना घडल्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतप्त वातावरण आहे. किमान आता तरी पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी मागणी पालकांनी केली आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हिंगोलीमध्ये दाखल

Smart Meter : अचानक वीज बिल दुप्पट-तिप्पट, स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना जोरदार 'शॉक', राज्यात संतापाचे वातावरण

Shocking : नाशिक हादरलं! विवाहित पुरुषाचं अल्पवयीन मुलीसोबत अमानुष कृत्य, वारंवार अत्याचार; गर्भवती राहताच...

कचरा म्हणून फेकून देऊ नका! 'आरोग्याचा खजिना' आहेत फणसाच्या बिया; 'हे' ५ फायदे तुमच्यासाठी उपयोगी

Maharashtra Fort : ट्रेकिंगची आवड आहे? मग पावसाळ्यात महाराष्ट्रातील 'हे' गड-किल्ले नक्की फिरा

SCROLL FOR NEXT