Beed Crime Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime : भावकीत शेत जमिनीतून वाद; पुतण्यांच्या मारहाणीत काकाचा मृत्यू, तिघां विरोधात गुन्हा दाखल

Beed News : पुतण्याच्या मारहाणीत काकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने बीड जिल्हा हादरून निघाला आहे मात्र अशा घटना थांबायचे नाव घेत नसून अशा आरोपीविरोधात कठोर शासन झाले पाहिजे अशी मागणी होत आहे.

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: भावकीत शेत जमिनीवरून वाद नेहमीच उद्भवत असतात. असाच भावकीत असलेला वाद उफाळून आला असता या वादातून पुण्याकडून काकाला मारहाण करण्यात आली. यात काकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आष्टी तालुक्यातील लोणी सय्यद मीर गावात समोर आली आहे. घटनेनंतर गावात तणाव असल्याने मयत व्यक्तीवर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले असून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बीड जिल्ह्यात दररोज गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा ढवळून निघाला असून कायदा आणि सुव्यवस्था बीडमध्ये राहिली आहे का? पोलिसांच्या खाकीचा धाक गुन्हेगारीत पार्श्वभूमीच्या लोकांवरती आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. अशातच बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा गावातील लोणीमध्ये शेत जमिनीच्या वादातून काकाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. 

पुतणे व सुनांकडून मारहाण 

आष्टी तालुक्यातील लोणी सय्यद मिरी येथील देवकर कुटुंबामध्ये अनेक दिवसापासून शेतातील बांधाच्या कारणावरून वाद होत होते. तसेच पाईपलाईनच्या कारणावरून धुसपुस सुरू होती. दरम्यान शनिवारी सायंकाळी घरासमोर सहा वाजता लहान मुले चेंडू खेळत असताना झालेल्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत होऊन तीनही पुतणे व सुना अशा सहा जणांनी मिळून कोयता लोखंडी पाईपने केलेल्या मारहाणीत छबू देवकर (वय ७२) हे गंभीर जखमी झाले. 

सहा जणांवर गुन्हा दाखल 

या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या छबू देवकर यांचा अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर वादामध्ये पडलेल्या छबू देवकर यांचा मुलगा मिठू देवकर आहे जखमी झाला आहे. याप्रकरणी अंभोरा पोलीस स्टेशनमध्ये सहा आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मृतावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS अधिकाऱ्याच्या आईचा संशयास्पद मृत्यू; तोंडात कपडा कोंबला अन्..;

Fenugreek water: या 5 व्यक्तींनी सकाळी रिकाम्या पोटी प्यावं मेथीच्या दाण्याचं पाणी; होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये सुमित पगारे हत्या प्रकरणात १४ जणांविरोधात गुन्हा दाखल

तुम्हीही सतत मोबाईल आणि टीव्ही पाहताय? जास्त स्क्रीन टाइमचे शरीरावर होणारे ५ गंभीर परिणाम, जे वाचून तुम्हालाच बसेल धक्का

Shiv Sena Hearing LIVE Updates : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? थोड्याच वेळात सर्वोच्च सुनावणी

SCROLL FOR NEXT