Beed Crime Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime: बीडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री आठ ते दहा दुकाने फोडली, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री आठ ते दहा दुकाने फोडली, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

विनोद जिरे

Beed Crime News: बीडच्या चौसाळा, नांदूरघाट येथे चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. एकाच रात्रीत आठ ते दहा दुकाने फोडून लाखो रुपयाचं साहित्य व रोकड लंपास केली आहे. तर ही चोरी करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

विशेष म्हणजे एका किराणा दुकानामधील तेलाचे डबे देखिल चोरून नेल्याची घटना घडलीय. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात नेकनुर आणि केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौसाळा गावात पोलीस चौकी उभारावी, अशी मागणी देखील गावच्या सरपंचांनी केली आहे.  (Maharashtra News)

चौसाळा येथील मोंढा रोडवर असलेल्या चंद्रकांत किराणा दुकानामध्ये रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. यात तेलाचे 15 डबे चोरून नेले. त्याचबरोबर 5 हजार रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली. दुसरी चोरीची घटना श्रीनाथ कलेक्शन या ठिकाणी घडली. येथील 57 हजार रुपये चोरून नेले. (Crime News)

जाधव यांच्या सराफा दुकानातील काही चांदी चोरून नेली. लहाने यांच्या मेडिकलमध्येही चोरी झाली. चौसाळ्यानंतर नांदूरघाट येथेही चोरीची घटना रात्री घडली. तांबोळी ट्रेडर्स येथील 10 ते 15 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेण्यात आले.

शुभम ट्रेडर्स येथील एक पानबुडी मोटार, विनायक कृषी सेवा केंद्र येथील काही साहित्य व रोख रक्कम, संकल्प मेडिकलही फोडली. या ठिकाणी मात्र चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT