Beed Crime Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime : हॉर्न वाजवल्याने बस चालकाला बेदम मारहाण; बसच्या काचाही फोडल्या

Beed News : बीड शहरातील बार्शी नका परिसरात दुपारच्या सुमारास हि घटना घडली आहे. या घटनेत रस्त्यावरून जात असलेल्या टेम्पोला साईड मागण्यासाठी मागून आलेल्या बस चालकाने हॉर्न वाजविला

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: पुढे चालत असलेल्या गाडीला मागून आलेल्या बस चालकाने साईड मागण्यासाठी हॉर्न वाजविला. याचा राग आल्याने पुढील टेम्पो चालकाने गाडी थांबवत बस चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना बीड शहरातील बार्शी नाका परिसरातील घडली आहे. इतकेच नाही तर सदर टेम्पो चालकाने बसच्या काचा देखील फेडल्या आहेत. 

बीड शहरातील बार्शी नका परिसरात दुपारच्या सुमारास हि घटना घडली आहे. या घटनेत रस्त्यावरून जात असलेल्या टेम्पोला साईड मागण्यासाठी मागून आलेल्या बस चालकाने हॉर्न वाजविला. वारंवार हॉर्न वाजविला असल्याचा राग आल्याने टेम्पो चालकाने टेम्पो रस्त्यात उभा करून खाली आला. यानंतर त्याने हॉर्न वाजवल्याने टेम्पो चालकाने बस चालकाला बेदम मारहाण केली. तसेच बसच्या समोरील काचा देखील फोडल्या आहेत. 

टेम्पो चालक फरार 

या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस येत असल्याचे समजतात टेम्पो चालक येथून फरार झाला आहे. दरम्यान या झालेल्या वादामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. तर पेठ बीड पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. मारहाणीत जखमी बस चालकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच टेम्पोच्या क्रमांकावरून शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज यांनी दिली आहे.

जुन्या भांडणातुन एकाला मारहाण
बीडच्या अंबाजोगाई शहरातील भावनातेश्वर मंदिराच्या रोडवर जुन्या भांडणाची कुरापत काढत एकाला लोखंडी रोडने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत वैभव शेंडगे हा जखमी झाला आहे. या प्रकरणी चेतन मगर, अनिकेत मगर, सुनील मगर आणि महेश पवार यांच्यावर अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु असून मारहाण करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT