Beed Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime News: संतापजनक! जमिनीच्या वादातून महिलेला केलं विवस्त्र? भाजप आमदाराच्या पत्नीवर गुन्हा दाखल

Beed News: संतापजनक! जमिनीच्या वादातून महिलेला केलं विवस्त्र? भाजप आमदाराच्या पत्नीवर गुन्हा दाखल

विनोद जिरे

Beed Crime News:

बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका जमिनीचा वादातून महिलेची विवस्त्र करत धिंड काढल्याचा आरोप करण्यात येत आहे. पीडित महिलेचा निर्वस्त्र अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती समोर येत आहे.

बीडच्या वाळूंज गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यासह अन्य दोघांवर बीडच्या आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, त्यांच्या वडिलांपासून 50 ते 60 वर्षांपासून वाळुंज शिवारातील जमीन त्या कसत आहेत. मात्र रघु, राहुल हे दोघे आणि मुख्य सूत्रधार प्राजक्ता सुरेश धस या पीडित पारधी कुटुंबाला जमिनीच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न आहेत. (Latest Marathi News)

एक ना अनेक वेळा त्रास देखील दिलाय. याच दरम्यान 15 ऑक्टोबरला आम्ही शेतात काम करत असतांना रघु आणि राहुल यांनी येऊन माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय. त्यांना प्राजक्ता धस यांनी प्रोत्साहन दिल, असा गंभीर आरोप पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत केलाय.

दरम्यान, याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता सुरेश धस, रघु आणि राहुल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT