Beed Crime News Saam TV
महाराष्ट्र

Beed News: संतापजनक! ८ वर्षीय चिमुकल्यावर कनिष्ठ लिपिकाचा अत्याचार; शासकीय निरीक्षण गृहातील धक्कादायक प्रकार

Beed Crime News: शहरातील शासकीय निरीक्षण गृहात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Satish Daud

Beed Crime News

बीड जिल्ह्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ८ वर्षीय चिमुकल्याला धमकावत एका नराधमाने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला आहे. शहरातील शासकीय निरीक्षण गृहात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी निरीक्षण गृहाच्या अधीक्षकांनी दिलेल्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. (Latest Marathi News)

अतिश असं अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव असून तो शासकीय निरीक्षणगृहात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. हा संपूर्ण प्रकार उघडकीस येताच शहरात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अतिश हा नराधम आरोपी बीड शहरातील (Beed News) नगर रोडवर असलेल्या शासकीय निरीक्षणगृहात कार्यरत होता. १ ऑक्टोबर रोजी त्याने निरीक्षण गृहातील एका ८ वर्षीय चिमुकल्याला धमकावत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला.

याबाबत कुणाला सांगितल्यास त्याला जीवे मारण्याची धमकी (Crime News) सुद्धा दिली. दरम्यान, चिमुकल्याने ही बाब निरीक्षण गृहातील त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलांना सांगितली. या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर निरीक्षण गृहातील इतर ३ मुलांनीही आपल्यासोबत असा प्रयत्न झाल्याची माहिती अधीक्षकांना दिली.

या घटनेनंतर निरीक्षण गृहाचे अधीक्षक सुदाम निर्मळ यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अतिश याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

SCROLL FOR NEXT