Beed Crime News: बीडच्या केज तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्रीत 4 दुकाने फोडली; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed Crime News: बीडच्या केज तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्रीत 4 दुकाने फोडली; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

Beed Latest News: चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून चोरीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

विनोद जिरे

Beed Crime News: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये चोरीच्या घटना समोर येत आहेत. बीड जिल्ह्यातही चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून बीडच्या केज तालुक्यात एकाच रात्रीमध्ये चार दुकानी फोडली आहेत. या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून चोरीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील (Beed News) केज, सुर्डी फाटा आणि माळेगाव या ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चारचाकी वाहनातून तोंड बांधून आलेल्या या चोरट्यांनी गावातील चार दुकाने फोडली आहेत.

यांपैकी माळेगाव येथील एका मशिनरी दुकानाच्या गल्ल्यातून 11 हजार 500 रुपये लंपास केले तर केज येथील एका औषधाच्या दुकानाच्या गल्ल्यात चिल्लर देण्यासाठी ठेवलेली रोख रक्कमही चोरट्यांनी पळविली आहे.

दरम्यान एका चार चाकी वाहनातून तोंड बांधून आलेल्या चार चोरट्यांनी, शटर वाकवून दुकानात प्रवेश केल्याचे व कुणाची तरी चाहुल लागताच गाडीत बसून निघून गेल्याचे दृष्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

याप्रकरणी बीडच्या केज आणि युसूफवडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या चोरीच्या घटनांनी परिसरात चोरट्यांची दहशत पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती मनपाची धडक कारवाई, 36.45 लाखांच्या थकबाकीसाठी दोन मालमत्ता सील

भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

SCROLL FOR NEXT