Beed Crime News
Beed Crime News Saam TV
महाराष्ट्र

Beed Crime News: अंध महिलेच्या ३ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; पुरोगामी महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना

विनोद जिरे

Beed News : बीडमधून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका अंध महिलेच्या ३ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला आहे. नराधमांनी चिमुकलीला खाऊचे अमिश दाखवून उचलून नेलं. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. ही धक्कादायक घटना शहरातील क्रीडांगणाच्या परिसरात रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.  (Latest Marathi News)

याप्रकरणी आज पहाटे बीड (Beed) शहर पोलीस ठाण्यामध्ये एका अज्ञात आरोपीवर कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहे. विशेष म्हणजे घटनास्थळावर रक्ताचे डाग देखील आढळून आले आहेत. या घटनेनंतर परिसरातून मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३ ते ४ नराधमांनी हे संतापजनक कृत्य (Crime News)  केलं आहे. चिमुकल्या मुलीला खाऊच आमिष दाखवून या क्रीडांगणाच्या शौचालयाच्या परिसरात नेल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी पीडित मुलगी ज्यावेळेस मोठमोठ्याने ओरडायला लागली, त्यानंतर हा सर्व प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आला आणि त्या ठिकाणाहून नराधम आरोपींनी तिथून धूम ठोकली.

या घटनेची माहिती कळताच, अप्पर पोलीस (Police) अधीक्षक सचिन पांडकर, डीवायएसपी संतोष वाळके, पोलीस निरीक्षक रवी सानप यांच्यासह फॉरेन्सिक लॅबची टीम घटनाथळी दाखल झाले होते. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत, पीडित चिमुकलीला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनास्थळाच्या परिसरातील नागरिकांनी, तीन ते चार जण त्या ठिकाणी होते, मुलीने आरडाओरड केल्यावर ते पळत गेले. अशी प्राथमिक माहिती दिली आहे. त्यामुळे या गुन्ह्यात एक आरोपी होता का तीन ते चार जण सहभागी होते ? याचा तपास करण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासाकडं सर्वांचे लक्ष लागलंय.

दरम्यान, मागून खाणाऱ्या एका अंध महिलेच्या चिमुकल्या मुलीवर उचलून नेऊन अत्याचार केल्याने, एकच खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळं पुन्हा एकदा महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अशा गुन्हेगारांना कडक शासन करायलाचं हवं. अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Cyber Fraud: धक्कादायक! शेअर ट्रेडिंमधून पैसा कमावण्याचे आमिष; पुण्यातील हॉटेल व्यावसायिकाला ४३ लाखांचा गंडा

Sanjay Raut : मुंबई महापालिकेने पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी ३ कोटी दिले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Pune Rain News: विज पडल्याच्या आवाजाने घाबरुन ३ महिला पडल्या बेशुद्ध; एकीचा मृत्यू

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; सामान्यांना मोठा दिलासा

Thane Crime News: धक्कादायक! मुंबईत धावत्या ट्रेनमध्ये मॉडेलवर अत्याचार; घटनेनंतर ३९ दिवसांनी गाठले पोलीस ठाणे

SCROLL FOR NEXT