Beed Gevrai Crime News
Beed Gevrai Crime News Saam TV
महाराष्ट्र

Beed Crime News : भररस्त्यावरून मुलीचं अपहरण, कॉफी सेंटरमध्ये बलात्कार; बीडमधील संतापजनक घटना

विनोद जिरे

Beed Crime News : मार्केटमध्ये कपडे खरेदी करण्यासाठी आलेल्या, एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला, तोंडात बोळा कोंबून, दुचाकीवर टाकून दोघांनी पळविले. त्यानंतर महामार्गालगत असणाऱ्या एका कॉफी सेंटरमध्ये, एकाने तिच्यावर बलात्कार केला. ही धक्कादायक आणि संतापजनक घटना बीडच्या (Beed) गेवराई शहरामध्ये घडली. (Beed Todays News)

पोलीस (police) सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील एका छोट्याशा गावात, पीडित मुलीचे वडील शेतात सालगडी म्हणून काम करतात. यादरम्यान काल पीडिता आणि तिची बहिण गेवराई शहर शहरातील तिच्या चुलत्यांकडे आली होती. यावेळी चुलतीने सन उत्सवानिमित्त दोघी बहिणींना नवीन कपडे घेण्यासाठी मार्केटमध्ये नेले.

कपडे घेऊन झाल्यावर, पीडितेची चुलती एक वस्तू आणण्यासाठी दुसऱ्या दुकानात गेली. याचाच गैरफायदा घेऊन, पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी, पीडितेच्या तोंडात रुमालाचा बोळा कोंबून तिला दुचाकीवर बसवलं. त्यानंतर सुसाट वेगाने दुचाकी गेवराई पासून बीडच्या दिशेने नेली. (Beed Gevrai Todays News)

यादरम्यान दोघांपैकी एकाने महामार्गालगत असणाऱ्या एका कॉफी सेंटरमध्ये पीडितेवर तीन वेळा बलात्कार केला. या संतापजनक घटनेनं गेवराई परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी गेवराई पोलिसांनी तात्काळ नराधम आरोपी रोहित अभिमान आठवले व त्याचा साथीदार सय्यद फरहाण याला अटक केली. (Beed Latest Crime News)

आरोपींविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात, कलम 376 पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेवराई पोलीस ठाण्यामध्ये आज एकाच दिवसांमध्ये, दोन बलात्काराचे गुन्हे दाखल झाल्याने पुन्हा एकदा महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळत आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashatra Election: ठाण्यात शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं? ठाण्याचा किल्ला राखणं शिंदेंना जड?

West Bengal News: पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक छळाचा आरोप; कर्नाटकचे खासदार प्रज्ज्वल रेवन्नाविरोधात लुकआउट नोटीस जारी

Jayant Patil: ... तर पंचाईत होईल, जयंत पाटील यांचा विश्वजित कदम यांना इशारा; नेमकं काय म्हणाले?

Pune Traffic News: पुण्यातील वाहतुकीत ४ मे पासून मोठे बदल; अनेक रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Baramati Lok Sabha: सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नोटीस, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT