Beed NCP corporator attack  Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime: बीड हादरले! परळीत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर धारदार शस्त्राने सपासप वार, तिघे गंभीर जखमी

Beed NCP corporator attack: बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात नगरसेवकासह दोघेजण गंभीर जखमी झाले. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

Priya More

Summary -

  • बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेवकावर प्राणघातक हल्ला

  • धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले

  • नगरसेवक आणि दोन मुले गंभीर जखमी

  • पोलिसांकडून तपास सुरू

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. बीडच्या परळीमध्ये ही घटना घडली. या हल्ल्यात नगरसेवक आणि त्याची दोन मुलं गंभीर जखमी झाली आहेत. नगरसेवकाच्या एका मुलाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस या हल्ला प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या परळीमध्ये रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. आझाद नगर या ठिकाणी राष्ट्रवादीचे नगरसेवक अजिज कच्ची यांच्या घरावर काही अज्ञातांनी हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी नगरसेवक आणि त्यांच्या दोन मुलांवर प्राणघात हल्ला केला. या हल्ल्यात नगरसेवक अजित कच्ची आणि त्यांचे दोन्ही मुले गंभीरित्या जखमी झाली आहेत.

अजित कच्ची यांच्या एका मुलाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढी उपचारासाठी अंबाजोगाई स्व.रा.ती.शासकीय दवाखान्यात हलवण्यात आले आहे. या अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास परळी पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : यवतमाळात औषधी विक्रेत्यांचा भव्य मुक मोर्चा

Modi Meloni Video : पंतप्रधान मोदींनी मेलोनींना दिली 'गोड' भेट; व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या, 'मेलोडी...'

Vanraj Andekar Case: पुण्यात पुन्हा गँगवॉर! बदला, राग आणि रक्तरंजित थरार! आंदेकर टोळीने ३ जणांची केली हत्या

Shocking : माणुसकीला काळिमा! ५ वर्षांच्या दिव्यांग मुलाची निर्घृण हत्या, आई वडील फरार; धक्कादायक कारण समोर

Rose Milkshake Recipe: कडाक्याच्या उन्हात घरीच बनवा टेस्टी आणि गारेगार गुलाब मिल्कशेक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT