Beed Crime News in Marathi,  विनोद जिरे
महाराष्ट्र

बीड हादरलं! 22 वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार

परळीच्या मिरवट गावात विवाहितेवर सामूहिक बलात्कार

विनोद जिरे

बीड: गेल्या ४ दिवसांपूर्वीचं बीड जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. तर आज पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराच्या घटनेने बीड (Beed ) जिल्हा हादरला आहे. बीडच्या परळी (Parli) तालुक्यात असणाऱ्या मिरवट गावांमध्ये, शेतात काम करत असणाऱ्या २२ वर्षीय विवाहितेवर, २ नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या मतदार संघात घटना घडल्याने एकचं खळबळ उडाली आहे. (Beed Crime News in Marathi)

हे देखील पाहा-

मिरवट गावातील (village) २२ वर्षीय पिडीत महिला ही शेतात आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. काल पीडिता आपल्या शेतातील (Farm) घरालगत शेतात काम करत होती. यादरम्यान अंगद केशव भदाडे (वय-४०) रा. मिरवट व साजन तिडके (वय-३०) रा. भोगलवाडी, या नराधम आरोपींनी पीडिता एकटी असल्याचा फायदा घेत, तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे. तर याविषयी कोणाला सांगितलं तर तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे मारू अशी धमकी देखील दिली होती. याप्रकरणी २२ वर्षीय पीडितेच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस (Police) ठाण्यात नराधम आरोपिंविरोधात ३७६ (ड), ३२३, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अवघ्या ३ तासात नराधम आरोपींना परळी ग्रामीण पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे.

दरम्यान गेल्या ४ दिवसांपूर्वीच बीडच्या बेलूरा गावातील २४ वर्षीय विवाहितेवर, चुलत पुतण्यासह गावातीलच ४ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. तर ही घटना ताजी असतानाच आता परळीच्या मिरवट गावात पुन्हा सामूहिक बलात्काराची घटना घडल्याने, बीड जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Express Mumbai To Solapur: मुंबई ते सोलापूर प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार? पाहा किती आहे तिकीट?

Maharashtra News Live Update: भोंदू बाबा मनोहर भोसले याचा आणखी एक कारनामा समोर

राज्यात एकनाथ शिंदेंची ताकद आणखी वाढणार, अख्खा पक्षच शिवसेनेत विलीन होणार?

Vande Bharat: मुंबईहून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोठा बदल, प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

पुढच्या आठवड्यात बारावीचा निकाल, दहावीच्या रिझल्टवरही अपडेट, mahresult.nic.in वर पाहा

SCROLL FOR NEXT