Beed Nagar Panchayat Elections Saam Tv
महाराष्ट्र

Council Elections: बीड जिल्ह्यात मुंडे- बहीण भावांची प्रतिष्ठा पणाला

बीड जिल्ह्यात नगर पंचायत निवडणुकीमध्ये मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. जिल्ह्यात 5 नगरपंचायतीची निवडणूक होत आहे

विनोद जिरे

5 नगरपंचायतमधील 85 जागांसाठी काही वेळात मतमोजणीला सुरुवात..

बीड : बीड जिल्ह्यात नगर पंचायत निवडणुकीमध्ये मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. जिल्ह्यात 5 नगरपंचायतीची निवडणूक होत आहे. यामध्ये वडवणी, केज, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार नगरपंचायतीचा समावेश असून 85 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. (Beed Nagar Panchayat Elections Update News)

काही वेळात मतमोजणीला (Counting of Votes) सुरूवात होत आहे. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दरम्यान जिल्ह्यात मुंडे - बहीण भावाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर आष्टी,पाटोदा, शिरूर कासारमध्ये भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब अजबे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

त्याचबरोबर केजमध्ये काँग्रेस (Congress) खासदार रंजनीताई पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. राष्ट्रवादीचे (NCP) जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी पहिल्यांदाच आपल्या मुलीला निवडणूक रिंगणात उतरवलं असून धनंजय मुंडेंच्या माध्यमातून मोठी ताकद लावली आहे. त्यामुळं गुलाल कुणाचा ? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का; महायुतीकडून विश्वासघात झाल्याचा दराडेंचा आरोप

Marathi Actor : प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन

Rain Alert : राज्यात पावसाच्या मुसळधारा, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; मुंबईकरांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

नागपुरात खळबळ! हॉस्पिटलमध्येच डॉक्टर मृतावस्थेत आढळले; मृतदेहाजवळ सापडलेली 'ती' गोष्ट पाहून पोलीसही चक्रावले

Shiv Sena : आणखी एक बंडखोर शिंदेसेनेत, परंतु थेट पक्षात प्रवेश नाही;पाहा नेमकं काय?

SCROLL FOR NEXT