Beed News Saam Tv
महाराष्ट्र

Beed News: खळबळजनक! घराला चिकटवले धमकीचे पत्र; काय आहे हा सगळा प्रकार?

बीडच्या सिरसाळा गावातील खळबळजनक प्रकार...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Beed Crime News : "इस्लाम से गुस्ताखी की एक ही सजा, सर तन से जुदा, जल्द ही तेरा सर तन से जुदा किया जायेगा" अशा प्रकारचे धमकीचे पत्रच एका घराला चिकटवल्याने बीडच्या परळी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात समाजकंटकाविरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याविषयक पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून सिरसाळा येथे राहणारे तक्रारदार उमेश रंगनाथ पवार यांच्या घराला धमकीचे हिंदी भाषेतील एक पत्र चिकटवण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. याबाबत त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना याचा शोध घेता आला नाही.

त्यामुळे त्यांनी पत्रातील धमकीच्या मजकुराचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी सिरसाळा पोलिसांनी घटनेची सविस्तर शहानिशा केली असून घटनास्थळी जाऊन पहाणी केली असून याप्रकरणी अज्ञात समाजकंटकाविरुद्ध सिरसाळा पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पत्रात काय धमकी दिलीय....

आरएसएस के गुंडे तू सिरसालेमे आरएसएस चलता है, तुझे पता नही है क्या इस्लाम से गुस्ताखी की एक ही सजा, सर तन से जुदा, सर तन से जुदा, बहुत जल्दी तेरा सर तन से जुदा किया जायेगा तू आरएसएस का लीडर है ना रे ,तकदीर अल्लाहू अकबर.....अशा स्वरूपाचा उल्लेख या पत्रात नमूद आहे. दरम्यान सिरसाळा गावात धमकीचे पत्र मिळाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस नजर ठेवून आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitin Gadkari Case : नितीन गडकरींना धमकी, १०० कोटी खंडणीची मागणी; दोघांना ५ वर्षे तुरुंगवास

MSRTC Fare: एसटी बसचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले तिकीट दरवाढीचे संकेत

IPS Officer Transfer: सातपुते, कृष्ण प्रकाश अन् मुंडेंसह २४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात खळबळ

Buldhana Crime: बुलडाणा हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, कुऱ्हाडीने वार करत जागीच संपवलं

Maharashtra News Live Update: - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापोस्टरची जाळपोळ... नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक..

SCROLL FOR NEXT