Beed Breaking News Saam TV
महाराष्ट्र

Beed News: मोठी बातमी! निवडणुकीआधी बीडमध्ये सापडलं पैशाचं घबाड, कारमधून तब्बल १ कोटींची रोकड जप्त

Beed Breaking News: बीडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. खामगाव चेक पोस्टवर पोलिसांनी तब्बल १ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.

विनोद जिरे

Beed News

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून तिसऱ्या टप्प्यासाठी ७ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. या काळात अवैध्य पैशांचा वापर होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख नाकाबंदी केली आहे. अशातच बीडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. खामगाव चेक पोस्टवर पोलिसांनी तब्बल १ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.

यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कारमधून ही रोकड नेली जात होती. वाहनाची तपासणी करत असताना कारमध्ये लोखंडी पेटी आढळून आली. पोलिसांनी कारचालकाकडे याबाबत विचारपूस केली.

त्याने ही रक्कम द्वारकादास मंत्री बँकेची असल्याचे सांगितले. परंतु त्याच्याकडे आवश्यक कागदपत्र आढलून आले नाही. दरम्यान, सध्या पोलिसांनी ही रोकड ताब्यात घेतली आहे. यावेळी कसल्याच प्रकारचे बारकोड संबंधिताकडे नसल्याने अनेक संशय व्यक्त होत आहेत.

ऐरोलीत दीड कोटींची रोकड जप्त

निवडणूक विभागाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने शनिवारी (ता. ४) ऐरोली खाडीपुलावर दीड कोटींची रोकड जप्त केली. दुधाच्या टेम्पोतून ही रक्कम नेली जात होती. ठाणे आणि नवी मुंबईतील निवडणुकीकरिता ही रक्कम आणल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, रस्ता रोको आंदोलन करून अकोला जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? कोर्टात नेमकं काय झालं? वाचा A टू Z अपडेट

Diabetes and Modak: डायबिटीजचे रूग्ण मोदक खाऊ शकतात का? जाणून घ्या

SET Exam 2026: महत्वाची बातमी! सेटची परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलली, सप्टेंबरमध्ये 'या' दिवशी असेल पेपर

SCROLL FOR NEXT