Beed विनोद जिरे
महाराष्ट्र

"पक्ष्यांसाठी मूठभर चारा, घोटभर पाणी"; समीर शेख यांनी राबवला अनोखा उपक्रम...!

सध्या उन्हाच्या झळा दिवसेंदिवस बसू लागल्या असताना चारा पाण्याविना पक्षांचा चिवचिवाट सुरू आहे

विनोद जिरे

बीड: सध्या उन्हाच्या झळा दिवसेंदिवस बसू लागल्या असताना चारा पाण्याविना पक्षांचा चिवचिवाट सुरू आहे. हा चिवचिवाट थांबवण्यासाठी "मूठभर चारा आणि घोटभर पाणी" हा उपक्रम हाती घेऊन, सांगवी पाटण येथील सामाजिक कार्यकर्ते समीर शेख यांनी आपल्या घरासमोर पक्ष्यांना पाणी आणि चाऱ्याची सोय करत जनजागृती सुरू केली आहे.

हे देखील पहा-

बीडच्या आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील समीर शेख, हा तरुण नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतो, वारा पाऊस याची कसलीही तमा न बाळगता, तो मुक्या जीवांसाठी झटत असतो. दोन- तीन वर्षापासून पाऊस चांगला झाला असला, तरी यंदाच्या उन्हाळ्यात त्यांच्या झळा जाणवू लागल्या असून पक्षी चारा पाण्यासाठी चिवचिवाट करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अंगणात किंवा ओट्यावर मूठभर चारा आणि घोटभर पाणी हा उपक्रम हाती घ्यावा. असे आवाहन समीर शेख यांनी केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील चारही धरणे १०० टक्के भरले

गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

Cancer treatment: शक्तीवर्धक गोळ्यामुळे कॅन्सरवर मात करता येणार, संशोधनात मोठं यश

Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

सरकारी रुग्णालयात मोठा घोटाळा! बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात बड्या वैद्यकीय अधिकाऱ्याला अटक, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT