पोलीस मुख्यालयात धनंजय मुंडेंसमोर; बोगस रस्त्यावरून एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न... Saam Tv
महाराष्ट्र

पोलीस मुख्यालयात धनंजय मुंडेंसमोर; बोगस रस्त्यावरून एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न...

बोगस रस्त्याविषयी कारवाई होत नसल्याने, एकाने पोलीस मुख्यालयावर झेंडावंदनस्थळी धनंजय मुंडेंसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला

विनोद जिरे

बीड: बोगस रस्त्याविषयी कारवाई होत नसल्याने, एकाने पोलीस मुख्यालयावर (Police Headquarters) झेंडावंदनस्थळी धनंजय मुंडेंसमोर (Dhananjay Munde) आत्मदहन (Self-immolation) करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी झेंड्याच्या समोरचं अंगावर डिझेल (Diesel)ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

विनोद शेळके असे आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. बीड (Beed ) शहरातील पंचशील नगर रस्त्याचे बोगस काम झाल्याची तक्रार करून देखील कारवाई (Action) झाली नाही. त्यामुळे आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर अन् झेंडावंदन (flag salute) स्थळी आत्मदहनाचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली असून मंत्री धनंजय मुंडेंनी याची दखल घेतली आहे.

ते म्हणाले, की कोणताही रस्ता (road) एका व्यक्तीसाठी नसतो, त्यांनी चौकशीचे पत्र दिले असते तरी चौकशी (Inquiry) केली असती. त्या रस्त्याची आम्ही चौकशी करू.विशेष म्हणजे ट्राय पार्टीकडून देखील चौकशी करू, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली आहे.

Edited By-Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT