Ashti taluka horrific pickup accident Three female laborers die Saam Tv News
महाराष्ट्र

Beed Accident : भरधाव वाहनाचा टायर फुटला, चालकाचं नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी, ३ महिला मजुरांचा जागीच अंत; बीडमध्ये भीषण अपघात

Beed Accidrnt Three Women Death : बीडच्या आष्टी तालुक्यात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघात तीन महिला मजुरांचा मृत्यू झालाय. या पिकअप वाहनामध्ये १८ ते २० महिलांचा समावेश होता. बाकी महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

Prashant Patil

बीड : बीडमध्ये एक भीषण अपघाताची घटना उघडकीस आली आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे कांदा काढण्यासाठी निघालेल्या महिला मजुरांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून १५ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात बीड अहिल्यानगर महामार्गावरील धामणगाव परिसरात झाला. अपघात घडल्याचं समजताच पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करण्यात आली. आज सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला.

बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे कांदा काढण्यासाठी सकाळीच महिला मजुरांचा एक गट पिकअपमधून जायला निघाला होता. मात्र, धामणगाव परिसरात अचानक वाहनाचा टायर फुटला आणि चालकाचं नियंत्रण सुटल्याने पिकअप पलटी झाला. या पिकअपमध्ये साधारण १८ ते २० महिला होत्या. वाहन उलटल्याने ते रस्त्याच्या कडेला उलटलं. या भीषण अपघातात जागीच तीन महिलांचा मृत्यू झाला. तर १५ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते.

जखमी महिलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अपघाताचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली असून टायर फुटल्यामुळे वाहन पलटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय. कामगार दिनाच्या दिवशी मजुरीसाठी निघालेल्या महिलांचा जीव गेल्याच्या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी गोंधळाचं वातावरण होतं. पलटी झालेल्या वाहनाचा चक्काचूर झाला आहे. कड्याजवळील खोल ओढ्यात येताच पिकअपचं समोरील टायर फुटल्याचं सांगितलं जात आहे. सध्या उन्हाळी कांदा काढणीच्या कामासाठी मजूरीसाठी मोठ्या प्रमाणावर महिला कामावर जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT