बीड: 'त्या' बालविवाहितेवर बलात्कार प्रकरणी निलंबित मुख्याध्यापकसह एका महिलेला पोलिसांनी घेतलं ताब्यात Saam Tv
महाराष्ट्र

बीड: 'त्या' बालविवाहितेवर बलात्कार प्रकरणी निलंबित मुख्याध्यापकसह एका महिलेला पोलिसांनी घेतलं ताब्यात

साम टीव्हीच्या बातमीनंतर आता पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आहे.

विनोद जिरे

बीड : बीडच्या अंबाजोगाईत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत साम टिव्हीने बातमी दाखवली होती. या साम टीव्हीच्या बातमीनंतर आता पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आहे. काल पीडितेचा पुरवणी जबाब इनकॅमेरा घेण्यात आला आहे. यावेळी पीडितेने अत्याचार करणाऱ्या काही लोकांची नावे तर काहींचे वर्णन व घटनास्थळाची सविस्तर माहिती दिली आहे.

हे देखील पहा-

यात तिने दोन पोलिसांचाही उल्लेख केला आहे . त्यापैकी एकाने हॉटेलवर नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्याने तिला स्वतःच्या घरी नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक दावा तिने केला. अंबाजोगाईच्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात, अंबाजोगाई पोलिसांनी आणखी २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना 19 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोमवारी या प्रकरणात ४ आरोपींना अटक करण्यात आली होती . त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

अंबाजोगाई शहरात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६ महीन्यात 400 वेळा अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. यातून ती पिडीता ५ महिन्यांची गर्भवती आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आली आहे. हा तपास अतिरीक्त पोलीस अधीक्षक कवीता नेरकर यांच्याकडे सोपवण्यात आल्यानंतर सोमवारी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. काल उशिरा निलंबीत मुख्याध्यापकासह एका महिलेस पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयासमारे उभे केले असता दोघांनाही ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: लंडनमध्ये युवराज खोपडे यांचा कुस्तीचा डंका

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT