आरोग्य भरती प्रकरणी महत्वाची घडामोड, आणखी एका वर गुन्हा दाखल Saam Tv
महाराष्ट्र

आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरण 'वडझरी पटर्न'च्या आणखी एकावर गुन्हा दाखल!

आरोग्य विभागाच्या नोकर भरती 'गट क' आणि 'ड' च्या पेपरफुटी प्रकरणांमध्ये, भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी संजय सानप याला अटक करण्यात आली होती.

विनोद जिरे

बीड : आरोग्य विभागाच्या नोकर भरती 'गट क' आणि 'ड' च्या पेपरफुटी प्रकरणांमध्ये, भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी संजय सानप याला अटक करण्यात आली होती. आणि त्यानंतर बीडचा 'वडझरी पॅटर्न' उघडकीस आला होता. आतापर्यंत जवळपास 50 लोकांना नोकरीला लावल्याची चर्चा सुरू असून जवळपास 250 ते 300 विद्यार्थ्यांकडून ऑक्टोबरमध्ये झालेल्या परीक्षेसाठी पैसे घेतल्याचं देखील सांगण्यात येत आहे.

हे देखील पहा :

तर, याच प्रकरणात आता 'वडझरी पॅटर्न' च्या आणखी एका मोहऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. राजेंद्र सानप अस या आरोपीचे नाव आहे. दरम्यान बीड जिल्ह्यातील हा पेपरफुटी प्रकरणातील 9 वा आरोपी असून पेपरफुटी मधील अनेक मोहरे खुलेआम फिरत असल्याची चर्चा बीड जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे पुणे सायबर पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश करावा. अशी मागणी सर्वसामान्य विद्यार्थ्यातून होत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO ची WhatsApp सेवा सुरू! फक्त ‘Hello’ करा आणि मिळवा PF खात्याची संपूर्ण माहिती

Hair Care: महागडे हेअर केअर प्रोडक्ट्स विसरा! केसगळती कमी करण्यासाठी 'या' ७ गोष्टी ठरतील फायदेशीर

Shocking : भारतीय क्रिकेटपटूच्या भावाविरोधात गुन्हा दाखल, केबिन क्रू महिलेने केले गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: कल्याणच्या प्रसिद्ध कुंभारवाड्यात बाप्पाला घरी नेण्यासाठी भाविकांची गर्दी; ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचा जयघोष

Manoj jarange: मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उद्या एकटेच मुंबईला येणार; पुढच्या आंदोलनाचा संपूर्ण प्लान सांगितला

SCROLL FOR NEXT