Ambajogai Crime Saam tv
महाराष्ट्र

Ambajogai Crime : मामानेच केला भाच्याचा खून; जमिनीच्या वादातून भरदिवसा घडली घटना

Beed News : सकाळी ज्यूसबारवर आला होता. यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर जोरदार भांडण करत दगड आणि लाकडानी राजेंद्र याच्यावर जोरदार हल्ला

विनोद जिरे

बीड : मामा आणि भाच्यांमध्ये जमिनीचा वाद सुरु होता. यातूनच दोघांचा वाद उफाडला. यामध्ये मामाने आपल्या ३७ वर्षीय भाच्याचा दगडाने ठेचून खून केला. ही धक्कादायक घटना (Beed) बीडच्या अंबाजोगाई शहरात भर दिवसा आणि मुख्य रस्त्यावर घडली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. (Tajya Batmya)

अंबाजोगाई शहरातील महसूल कॉलनीत वास्तव्यास असलेले राजेंद्र श्रीराम कळसे (वय ३७) असे मृत तरुणाचे नाव आहे. मयत राजेंद्र आणि त्याचे मामा यांच्यात (Crime News) जागेवरून वाद होता. आरोपी मामाचे अंबाजोगाई शहरात ज्यूसबार आहे. मयत राजेंद्र सकाळी ज्यूसबारवर आला होता. यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर जोरदार भांडण करत दगड आणि लाकडानी राजेंद्र याच्यावर जोरदार हल्ला केला. राजेंद्रच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डोक्यात दगड मारून आरोपी फरार 

दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला. घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी येऊन पोलिसांनी पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत आहेत. दरम्यान मामाकडूनच भाच्याचा खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bageshwar Baba : छत्रपती शिवाजी महाराज थकले अन् समर्थांकडे राजपाट दिला, बागेश्वर बाबांचे वादग्रस्त वक्तव्य

Mumbai Accident : पवईत भीषण अपघात, BMC तील तरूण डॉक्टरचा मृत्यू

Maharashtra News Live Update: दोन भूमिपूजन मोहन भागवत यांच्या हस्ते संपन्न झाले - देवेंद्र फडणवीस

जीमचा नाद, जीवन बरबाद? अतिव्यायाम केला, तरुणाच्या अंगलट आला

April Grah Gochar: एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या ग्रहाचं गोचर; बुधादित्य राजयोग एका रात्रीत पालटणार नशीब

SCROLL FOR NEXT