Beed accident  Saam Tv
महाराष्ट्र

बीड - परळी महामार्ग बनला मृत्यूचा सापळा; सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात, १ ठार

बीड-परळी (Beed) महामार्ग जणू काही मृत्यूचा सापळा बनला आहे. दिवसेंदिवस या महामार्गावर अपघाताची मालिका सुरू आहे.

विनोद जिरे

बीड : बीड-परळी (Beed) महामार्ग जणू काही मृत्यूचा सापळा बनला आहे. दिवसेंदिवस या महामार्गावर अपघाताची मालिका सुरू आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी रिक्षा-पीकअप गाडीचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात १७ वर्षीय १ तरुण जागीच झाला आहे. तसेच या अपघातात ३ जण गंभीर झाले आहेत. बीड-परळी महामार्गावरील पोखरी फाट्यावर अपघात झाला आहे. ( Beed accident News In Marathi )

बीड-परळी महामार्गावरील पोखरी फाट्यावर भीषण अपघात झाला आहे. अपघातातील दोन्ही वाहने बीडहून वडवणी जात होते. यादरम्यान, रिक्षाचे उजव्या बाजूचे टायर फुटले. यावेळी पिकअपची रिक्षाला जोरदार धडक बसली. यामुळे १७ वर्षीय ओमकार महादेव क्षीरसागर हा मुलगा टायरखाली येऊन जागीच ठार झाला आहे. त्याच्यासोबत अन्य ३ प्रवासी देखील पिकअप खाली आले. पिकअप खांब्याला धडकल्याने गती कमी झाली. या अपघातात तीन जखमीपैकी १ जण गंभीर जखमी आहे. या अपघातामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर आजूबाजूला राहणारे रहिवासी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावले. या अपघातात जखमी झालेल्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, २ दिवसांपूर्वीच एका कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला होता. तर गेल्या काही दिवसांपूर्वी २ दुचाकी समोरासमोर धडकल्याने २ जण जागीच ठार झाले होते. या महामार्गावर हे अपघात थोड्या-थोड्या अंतरावर घडले आहेत. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अपघात वाढल्याने बीड-परळी येथे राहणाऱ्या लोकांची चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे स्थानिकांनी वाढते अपघात रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने महामार्गावर दुरुस्ती करावी, अशी मागणी लोकांमध्ये होऊ लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहणं आमची जबाबदारी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Union Budget 2026: अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठी घोषणा, सुरु केली नवीन योजना; फायदा काय?

Budget 2026: रिवाइज्ड ITRसाठी मुदतवाढ; नवीन प्राप्तिकर कायदा कधीपासून होणार लागू?

Rohit Shetty House Firing: रोहित शेट्टी हल्ला प्रकरणाला नवे वळण; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाशी थेट कनेक्शन

महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून काय काय मिळालं? देवेंद्र फडणवीसांनी दिली A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT