Beed Accident Saam Tv
महाराष्ट्र

Beed Accident : लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी जाताना जीपचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तीन जण गंभीर जखमी

Beed Car Accident : केज-बीड रोडवर सकाळी सांगणी पुलाजवळ टेम्पो आणि जीपचा अपघात झाला. या अपघातामध्ये दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला. तसेच गाडीतील तिघे गंभीररित्या जखमी झाले.

Yash Shirke

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

Accident On Beed Road : बीडमध्ये आज सकाळी केज-बीड रोडवर एक भीषण अपघात झाला. कॅन्टर टेम्पो आणि जीपमध्ये अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात बीड रोडवरच्या सांगवी पुलाजवळ झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जीपमधून नातेवाईकांच्या लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी पाच जण बीडहून आहिल्यानगरला चालले होते. दरम्यान केज-बीड रोडवर सांगवी (सारणी) पुलाजवळ टेम्पो आणि जीपची धडक झाली. यात उर्मिला उर्फ उमा श्रीराम घुले या महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्या केज तालुक्यातील कोरेगावच्या रहिवासी होत्या.

बीड रोडवरील या भीषण अपघातामध्ये लक्ष्मण डोईफोडे, राम डोईफोडे आणि अन्य दोघांना जबर मार बसला. गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना उपचारांसाठी अंबाजोगाईच्या सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. दरम्यान लक्ष्मण डोईफोडे यांचा मृत्यू झाला आहे. तर इतर तिघांवर दवाखान्यामध्ये उपचार सुरु आहेत.

नातेवाईकाच्या लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी, लग्नाचे कपडे खरेदी करण्यासाठी हे पाच जण अहिल्यानगरला जात होते. प्रवासादरम्यान त्यांच्या गाडीचा अपघात झाला. अपघात दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही मृत व्यक्ती पेशाने शिक्षक असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय अपघातात तीन जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह केजच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Historic Places : नर्मदा तटावरील राजेशाही वैभव, 'या' किल्ल्याचे रूपांतर झाले लग्जरी हॉटेलमध्ये, पर्यटकांची होते गर्दी

Bollywood Property: मलाइकाने अलिशान फ्लॅट दिला रेंटवर, इकडे सारा अन् माधुरीनं घर घेतलं भाड्याने, कितीची झाली उलाढाल?

Sonam Kapoor Baby Photo : बाळाला हातात घेताच सोनम कपूर भावुक, अनिल कपूरच्या नातवाची पाहा पहिली झलक

राज्य सरकारचा दिलासा! रेडी रेकनरच्या दराबाबत घेतला मोठा निर्णय, वाचा काय होणार फायदा?

Rule Change From Today: ATM लिमिट ते ट्रेडिंग; आजपासून ४ महत्त्वाचे नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT