Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : गाढ झोपेतच मृत्यूने गाढले; अंगावरून डंपर गेल्याने २ तरुणांचा मृत्यू

Beed News : बीड जिल्ह्यातील पाली गावात मुरूम खोदकाम सुरु होते. या ठिकाणे हे दोघे तरुण गेले होते. मुरूम भरण्यासाठी गाडी नसल्याने थोडा आराम म्हणून दोघेही रात्री मशीनच्या जवळच झोपले

विनोद जिरे

बीड : मुरूम खोदकामासाठी गेलेल्या दोन तरुणांचा दुर्देव मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास पोकलॅन मशीनजवळ झोपले होते. यावेळी मुरूम भरण्यासाठी आलेले डंपर अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. 

समाधान थोरात व सुभाष कुमार चव्हाण असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांचे नाव आहे. घटनेत मृत झालेले समाधान आणि सुभाष हे दोघे मुरूम खोदण्यासाठी पोकलेन चालवण्याचे काम करत होते. बीड (Beed) जिल्ह्यातील पाली गावात मुरूम खोदकाम सुरु होते. या ठिकाणे हे दोघे तरुण गेले होते. मुरूम भरण्यासाठी गाडी नसल्याने थोडा आराम म्हणून दोघेही रात्री मशीनच्या जवळच झोपले होते. परंतु दुर्देवाने दोघा तरुणांना गाढ झोपेतच (death) मृत्यूने गाठले. 

दोघे तरुण झोपले असताना त्यांच्या अंगावरून डंपर गेल्याने हे दोघेही जागीच ठार झाले. ही बाब निदर्शनास (Accident) आल्यानंतर डंपर चालक फरार झाला होता. दरम्यान बीडच्या ग्रामीण पोलिसांनी या ठिकाणी तात्काळ धाव घेऊन हा डंपर ताब्यात घेतला आहे. दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास आता पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup : वर्ल्डकपमधून विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार संघ आऊट, श्रीलंका बाहेर; न्यूझीलंडचा दणदणीत विजय

MSRTC: शिवशाही बस आता नव्या अवतारात येणार; राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूदरात लक्षणीय घट; सरकारचे कोणते उपाय ठरताहेत गेम चेंजर?

खाण उपसंचालकावर व्हिजिलन्सची धाड, अधिकाऱ्याच्या घरात नोटांच्या थप्या

कर्जफेडीसाठी 19 शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या, विरोधक आक्रमक, अधिवेशनात पडसाद

SCROLL FOR NEXT