Devani Crime दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

शेतीच्या बांधाच्या वादातून कोयत्याने मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

ऊस तोडायच्या कोयत्याने एकास हातावर आणि डोक्यात मारुन जखमी केल्याची धक्कादायक घटना

दीपक क्षीरसागर

लातूर: सामाईक बांध आणि लाईटचा आकडा यावरून झालेल्या वादातून ऊस (Sugarcane) तोडायच्या कोयत्याने एकास हातावर आणि डोक्यात मारुन जखमी केल्याची धक्कादायक घटना रात्री ७ वाजेच्या सुमारास देवणी (Devani) तालुक्यातील टाकळी शिवारात घडली आहे. याप्रकरणी देवणी पोलीस (Police) ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

अशोक गणपतराव अर्जुने (रा. कोरेवाडी) यांना माधव नागशेट्टी बिरादार, अमोल माधव बिरादार, नर्सिंग माधव बिरादार (सर्व रा. धनेगाव) यांनी संगणमत करुन मागील सामाईक बांधावरुन आणि लाईटचा आकडा टाकल्याबाबत विचारपूस का करता म्हणून ऊस तोडण्याचे कोयत्याने उजव्या हाताच्या अंगठ्याजवळ आणि डोकीत मारुन गंभीर जखमी केले.

तसेच भाऊ बालाजी अर्जुने हा भांडण सोडिवण्यास आला असता त्यालाही कोयत्याने उजव्या कानावर मारुन जखमी केले आहे. फिर्यादीची पत्नी सोजरबाई भांडण सोडविण्यास आल्या असता त्यांना ढकलून देऊन काठीने डाव्या पायावर मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी अशोक अर्जुने यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT